मुंबई : भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.16) सलग दुसऱ्या दिवशीही घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 318 अंकांनी घसरला. तर निफ्टी 25,000 च्या खाली घसरला. त्यामुळे आज बीएसई गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 80,000 कोटींची घट झाली.
बुधवारी BSE मिडकॅप निर्देशांक 0.10 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.31 टक्क्यांनी वाढला. आजच्या व्यवहारात सर्वाधिक घसरण आयटी, वाहन आणि सेवा क्षेत्रात दिसून आली. दुसरीकडे टेलिकॉम आणि रियल्टी समभागात तेजीचा कल दिसून आला. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 463.06 लाख कोटी रुपयांवर आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे मंगळवारी 463.86 लाख कोटी रुपये होते.
अशाप्रकारे BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 80,000 कोटी रुपयांनी कमी झाले. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 80,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बीएसई सेन्सेक्सच्या 30 पैकी फक्त 5 शेअर्स आज हिरव्या रंगात होते. यामध्ये एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 0.93 टक्के वाढ झाली.