मुंबई : सध्याच्या महागाईच्या काळात सर्वच गोष्टींचे आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे अनेकजण आपापल्या सोयीनुसार आर्थिक आणि गुंतवणुकीचे नियोजन करत आहे. पण 50:30:20 हा आर्थिक नियोजनाचा असा काय फॉर्म्युला आहे, त्यानुसार जर काही गोष्टी केल्या तर नक्कीच फायदा होऊ शकेल, असे जाणकार सांगतात.
एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, 50:30:20 फॉर्म्युला किंवा नियम तुमची आर्थिक स्थिती तीन श्रेणींमध्ये ठेवते. गरजा, बचत आणि इच्छा. तुमच्या उत्पन्नापैकी 50 टक्के घरखर्च, किराणा सामानसह इतर काही गोष्टींकडे जायला हवा. तर 30 टक्के खर्च आपल्या गरजा, इच्छा पूर्ण करण्यासाठी केला पाहिजे. ज्यामध्ये प्रवास, हॉटेलिंगचा समावेश होऊ शकतो. तसेच 20 टक्के अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी खर्च केले पाहिजेत.
तुम्ही तुमच्या उत्पन्नातील 50 टक्के रक्कम तुमच्या गरजांसाठी बाजूला ठेवली पाहिजे. यामध्ये आवश्यक खर्चाचा समावेश आहे. त्यात भाडे, किराणा माल, आरोग्य सेवा, विमा प्रीमियम, मुलाची शाळा किंवा महाविद्यालयाची फी इत्यादींचा समावेश असू शकतो.