नवी दिल्ली : सध्या अनेक व्यवहार ऑनलाईन माध्यमातून केले जात आहेत. असे असताना आता भारताची डिजिटल अर्थव्यवस्था 2026 पर्यंत जीडीपीचा पाचवा हिस्सा बनले, असा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालात करण्यात आला आहे. भारताची डिजिटल अर्थव्यवस्था 2026 पर्यंत सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) एक पंचमांश होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
2023-24 साठी ‘रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स’ (RCF) च्या प्रस्तावनेत, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भर दिला आहे. यात वित्तीय क्षेत्रातील डिजिटायझेशनमुळे पुढील बँकिंग आणि वित्तीय सेवांमध्ये किफायतशीर किमतीत सुधारणा होत आहे. भारत डिजिटल क्रांतीमध्ये आघाडीवर असल्याचे अहवालात म्हटले आहे.
त्यातच देशात व्हायब्रंट ई-मार्केट उदयास येत आहेत आणि त्याचा आवाकाही वाढत आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेचा सध्या भारताच्या जीडीपीचा एक दशांश वाटा आहे; गेल्या दशकातील वाढीचा दर पाहता, 2026 पर्यंत तो जीडीपीच्या एक पंचमांश असेल, असे सांगण्यात येत आहे.