नवी दिल्ली : सध्या अनेक टेक कंपन्यांकडून गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यानुसार, कंपन्यांचा नफाही वाढताना दिसत आहे. असे असताना भारताचे पर्सनल कॉम्प्युटर (पीसी) मार्केट इतर जगापेक्षा चांगले आहे. तैवानची प्रसिद्ध कंपनी Asus साठी भारतीय बाजारपेठेत मोठी संधी मानली जाते. त्यानुसार, कंपनीकडून विशेष प्रयत्नही केले जात आहेत.
भारतातील सुमारे 10 ते 11 टक्केच घरांमध्ये पीसी अर्थात कॉम्प्युटर आहे. असे असल्याने सुमारे 90 टक्के भारतीय घरांमध्ये अजूनही पीसी नाही, असे आसूसकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच कंपनीसाठी ही मोठी संधी मानली जाते. भारताकडे पाहिले तर 750 जिल्ह्यांपैकी जवळपास 450 जिल्ह्यांपर्यंत आसूस कंपनी पोहोचली आहे.
आशिया-पॅसिफिक पीसी बिझनेस युनिटचे आसुसचे सरव्यवस्थापक पीटर चांग यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘कोविड महामारीनंतर कंपनीला जागतिक स्तरावर आणि भारतात पीसीच्या मागणीत फारशी सकारात्मक चिन्हे दिसली नाहीत. पण, यावर्षी लॅपटॉप खरेदी करण्यात रस वाढला आहे, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की बाजार लवकरच सामान्य होईल, असे सांगण्यात आले.