Demat Account: मुंबई : भारतात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. चांगला परतावा मिळत असल्याने शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. यामुळे देशभरात डिमॅट खात्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्यात डिमॅट खाती उघडणाचा विक्रम झाला आहे.
ऑक्टोबरमध्ये 13.22 कोटींहून अधिक लोकांनी डिमॅट खाती उघडली आहेत. डिमॅट खाती उघडण्याचा हा आकडा 11 महिन्यांतील उच्चांक आहे. यापैकी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसमध्ये सुमारे 9.85 कोटी खाती आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीमध्ये 3.38 कोटी खाती आहेत. भारतातील शेअर बाजारात मार्च महिन्यानंतर मोठी वाढ झाली आहे.
शेअर बाजार नियामक सेबीच्या नियमांनुसार, तुम्हाला शेअर बाजारात शेअर्सची खरेदी किंवा विक्री करायची असेल, तर तुमच्यासाठी डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. डिमॅट खाते है बँक खात्यासारखे असते. डिमॅट खात्यात लोक त्यांचे शेअर्स ठेवू शकतात.
आतापर्यंत मिडकॅप शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. बहुतेक गुंतवणूकदार मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये पैसे गुंतवणे सुरक्षित मानतात. मार्चपासून आतापर्यंत सेन्सेक्स 9.34 टक्के आणि निफ्टी 11.24 टक्क्यांनी वाढला आहे.