नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. नवीन किमती १५ मार्च २०२४ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतील.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 2 रुपयांनी कपात करून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, कोट्यवधी भारतीयांच्या कुटुंबाचे कल्याण आणि सुविधा हे त्यांचे ध्येय आहे.
पेट्रोल और डीज़ल के दाम ₹2 रुपये कम करके देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने एक बार फिर साबित कर दिया कि करोड़ों भारतीयों के अपने परिवार का हित और सुविधा सदैव उनका लक्ष्य है।
वसुधा का नेता कौन हुआ?
भूखण्ड-विजेता कौन हुआ?
अतुलित यश क्रेता कौन हुआ?
नव-धर्म… https://t.co/WFqoTFnntd pic.twitter.com/vOh9QcY26C— Hardeep Singh Puri (मोदी का परिवार) (@HardeepSPuri) March 14, 2024