Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जेजुरीला बायपास रस्ता होणार; गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत १० कोटी ६८ लाखांचा निधी मंजूर

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 14 March 2024, 22:24
10 crore fund for jejuri bypass in cabinet meeting maharashtra government

पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी १७ फेब्रुवारीला झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत जेजुरी येथील बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची मंजूरी मिळाली असून, त्यासाठी १० कोटी ६८ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

अजित पवार यांनी जेजुरी येथील बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच त्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार प्रस्ताव तयार करुन त्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची आणि मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीची मान्यता घेण्यात आली. बुधवारी नवीन कामांचा व निधी मंजुरीचा शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यात श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी येथील बाह्यवळण रस्त्याचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या वतीने श्री खंडोबा देवाच्या व जेजुरी शहर विकासासाठी सुमारे ३४९.४५ कोटी रकमेचा श्रीक्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखडा एकूण तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या १०९ कोटी ५७ लाख रुपयांच्या कामांमध्ये अधिकचे १० कोटी ६८ लाख रुपये मंजूर करुन हा नवीन बाह्यवळण रस्ता समाविष्ट करण्यात आला.

 

खर्च आणि त्यासाठी करण्यात आलेली तरतूद

या निधीतून, मंदिर व संपूर्ण तटबंदीचे जतन व दुरुस्तीसाठी ११ कोटी २३ लाख रुपये, दीपमाळांचे जतन व दुरुस्तीसाठी ११ कोटी २५ लाख रुपये, उत्तर-पूर्व व पश्चिम पायर्‍या, १३ कमानी, सहायक संरचना जतन आणि दुरुस्तीसाठी १२ कोटी २२ लाख रुपये, ऐतिहासिक होळकर व पेशवे तलाव आणि इतर जलकुंडांचे जतन व दुरुस्तीसाठी १२ कोटी ५६ लाख रुपये.

तसेच मल्हार गौतमेश्वर मंदिर, लवथळेश्वर व बल्लाळेश्वर मंदिरांचे जतन व दुरुस्तीसाठी २ कोटी २ लाख रुपये, कडेपठार मंदिर दोन पायरी मार्गांचे जतन व दुरुस्तीसाठी १० कोटी ७३ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली. तसेच मूलभूत पायाभूत सुविधेअंतर्गत १२ कोटी रुपये, भूदृशे विकसित करण्यासाठी १८ लाख रुपये आदी कामांचा समावेश आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरी चिंचवडच्या वाहतुकीचा कायापालट होणार! HCMTR आणि E-RTS प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग

Wednesday, 29 July 2026, 13:28

‘परफेक्ट बॉडी’चं स्वप्न दाखवायचा अन् प्रतिबंधित इंजेक्शन्स विकायचा; पुण्यात जिम ट्रेनरचा काळा धंदा उघडकीस

Wednesday, 29 July 2026, 12:39

न्यायालयाच्या आदेशालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेंगा! अभियंत्याच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त; …अखेर लोणी काळभोर, वडकी, कुंजीरवाडीच्या शेतकऱ्यांचा विजय

Wednesday, 29 July 2026, 12:33

पुण्यात भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! गणेश, भवानी आणि नाना पेठेत FDA चा मोठा छापा; विनापरवाना साठवलेल्या चॉकलेट्स-कँडीज जप्त

Wednesday, 29 July 2026, 12:12

‘मी लय मोठा होऊन दाखवीन’ सांगून गायब झालेला आर्यन गवारे सुखरूप सापडला; उरुळी कांचन पोलिसांच्या अन् पालकांच्या तत्परतेमुळे 24 तासांत लागला शोध

Wednesday, 29 July 2026, 11:51

नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला होता? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; कागदपत्र दाखवत केला खुलासा

Wednesday, 29 July 2026, 11:30
Next Post
Yavat Police action against hatbahtti leaker continues daund pune

यवत पोलिसांचे गावठी हातभट्टी चालकांवर कारवाईचे सत्र सुरूच; दहिटणे येथून चौघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.