नवी दिल्ली: कामाच्या ठिकाणी आणि परिसरात स्वच्छता आणि आरोग्य सांभाळण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या अभियानाला अनुसरून अवजड उद्योग मंत्रालयाने देशव्यापी स्वच्छता अभियान सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२४ या काळात या संदर्भात एकूण ७५७ कार्यक्रम आयोजित करण्यात आले, २९८२ फाइल्स निकालात काढण्यात आल्या. तसेच भंगार निकाली काढून आणि स्वच्छता करून १९.०७ लाख चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले, तर या दरम्यान भंगार विकून ६९.३७ करून मंत्रालयाने याबाबतीत दुसरा क्रमांक, तर नकोशा सामानाची कोटी रुपये इतकी महसुलात भर पडली आहे.
या उपक्रमामुळे कामाच्या ठिकाणचा अनुभव अधिक दर्जेदार होण्यास तसेच जागेचे व्यवस्थापन होऊन कामासाठी आरोग्यपूर्ण वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे. शिवाय महसुलातही भर पडली आहे. स्वच्छतेविषयी विशेष मोहीम ३.० चालवण्याच्या बाबतीत अवजड उद्योग मंत्रालय आघाडीवर होते. या मोहिमेदरम्यान भंगार विकून २१ लाख चौरस फूट जागा मोकळी करत विक्री करून ४.६६ कोटींचा महसूल निर्माण करून याबाबतीत पाचवा क्रमांक पटकावला आहे.
मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणात असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशी सल्लामसलत करून चौथा टप्प्याच्या विशेष मोहिमेसाठी ठिकाणे ठरवण्याची मंत्रालयाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच २ ऑक्टोबर २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या काळात विशेष मोहिमेच्या चौथ्या टप्यादरम्यान ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यावर भर दिला जात आहे. मंत्रालयाने १६ ते ३१ ऑगस्टदरम्यान केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसह स्वच्छता पंधरवडा साजरा केला. स्वच्छ आणि आरोग्यमय वातावरण सांभाळण्यासाठी यामध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रम करण्यात आले. त्याखेरीज, या मंत्रालयाअंतर्गतच्या सार्वजनिक कंपन्यांच्या सोबतीने, हे मंत्रालय ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेत सहभागी होत आहे. यात स्वच्छताविषयक उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.