सगळेच करोडपती होण्याचे स्वप्न पाहत असतात. परंतू, कमी पगारामुळे तुम्हाला अनेकांना असे वाटते की हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कारण, आजही अनेकांना सरकारच्या काही महत्त्वाच्या योजनांविषयी माहिती नाही. तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) सारख्या सरकारी योजनेद्वारे करोडपती बनू शकता. तेही अवध्या 25 वर्षात. खर वाटत नाहीये, मग ही बातमी नक्की वाचा.
या सरकारी हमी योजनेत तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. कारण, त्यावर बाजारातील चढउतारांचा परिणाम होत नाही. 65 ते 70 हजार रुपये पगार असणाऱ्यांसह 15 ते 20 हजार रुपये पगार असलेले ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेद्वारे तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न सहज पूर्ण करू शकता.
25 वर्षात व्हाल करोडपती
पीपीएफमध्ये वार्षिक गुंतवणुकीची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. म्हणजेच, करोडपती बनण्यासाठी, तुम्हाला दरवर्षी 1.5 लाख एवढी रक्कम पीपीएफमध्ये जमा करावी लागेल. महिन्याकाठी जर हिशोब केला तर, तुम्हाला पीपीएफमध्ये दरमहीना सुमारे 12,500 रुपये गुंतवावे लागतील. PPF योजना 15 वर्षांमध्ये परिपक्व होते. परंतु मुदतपूर्तीनंतर, तुम्हाला योगदान चालू ठेवून 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये दोनदा योजना वाढवावी लागेल. अशा प्रकारे तुम्हाला 25 वर्षे वार्षिक 1,50,000 रुपयांची गुंतवणूक चालू ठेवावी लागेल. सध्या या योजनेवर 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. तुम्ही गणना केल्यास, तुम्ही 25 वर्षांत 37,50,000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला 65,58,015 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे, गुंतवलेली रक्कम आणि व्याजाच्या रकमेसह 25 वर्षानंतर, तुम्हाला PPF मधून 1,03,08,015 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्ही 25 वर्षात करोडपती व्हाल.
दरमहा 12,500 गुंतवणूक केल्यास होणार मोठा फायदा
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या उत्पन्नाच्या 20 टक्के गुंतवणूक करने फायदेशीर ठरते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दरमहा 65,000 रुपये कमावत असाल, तर तुम्ही 20 टक्के दराने 13,000 रुपये गुंतवले पाहिजेत. जर 20,000 कमवत असाल तरी 12,500 रुपये गुंतवावे लागतील. PPF मध्ये तुम्हाला दरमहा फक्त 12,500 रुपये गुंतवणे गरजेचे आहे, त्यामुळे हे काम फार कठीण नाही. या योजनेत तुम्ही अगदी सहजपणे वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करु शकता आणि स्वतःला हमखास करोडपती बनवू शकता.