Gold Silver Rate : मुंबई : सोने-चांदीच्या दरांनी गेल्या दोन दिवसांत इतिहास रचला होता. किंमती गगनाला भिडल्या. मात्र, आज सोने आणि चांदीचे दर काहीशा प्रमाणात घसरल्याच चित्र आहे. 4 मे 2023 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये होती. ती मंगळवारी जवळपास 63,000 हजारांच्या घरात गेली होती. जुने सर्व रेकॉर्ड इतिहासजमा करत मंगळवारी आणि बुधवारी या मौल्यवान धातूंनी नवीन रेकॉर्ड केला होता. बुधवारी सोन्याचा भाव 62,629 रुपये होता. गुरुवारी या किंमतीत किंचित घसरण झाली.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
सोन्याच्या दरात 21-25 रुपयांनी किंमती घसरल्या आहेत. 24 कॅरेट सोने 62,607 रुपये, 23 कॅरेट 62,357 रुपये, 22 कॅरेट सोने 57,348 रुपये झाले. 18 कॅरेट 46,955 रुपये, 14 कॅरेट सोने 36,625 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 75,934रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोने घसरले
गुडरिटर्न्सनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दिवाळीपासून सोन्याची दरवाढ ही सुरूच असल्याची पहायला मिळाली. या आठवड्यात सोन्याने नवीन विक्रम केले. या आठवड्यात सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. 28 नोव्हेंबरला भाव वाढला नाही. 29 नोव्हेंबर रोजी भाव 820 रुपयांनी वधारले. 30 नोव्हेंबर रोजी भावात 650 रुपयांची घसरण झाली.
चांदी चमकली
आज शुक्रवारी एक किलो चांदीचा भाव 79,200 रुपये आहे. गेल्या आठवड्यात 1400 रुपयांनी चांदीची किंमती वधारली होती. 27 नोव्हेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढली होती. 28 नोव्हेंबर रोजी किंमती अपडेट झाल्या नाहीत. 29 नोव्हेंबर रोजी भावात 700 रुपयांची वाढ झाली.