Gold Silver Price : मुंबई : आज सोन्याचा दर 62,482 रुपयांच्या खाली आहे. चांदीचा दर 77,200 रुपयांवर आहे. सोमवारी सोन्याचे भाव उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस सोन्याच्या भावात घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याच्या भावात 100 रुपयांची वाढ दिसून येत आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या, कोलकत्तात 62,780 रुपये, दिल्लीत 62,930 रुपये, मुंबईत 62,780 रुपये, पुण्यात 62,780 रुपये, पाटनात 62,830 रुपये सोन्याचा भाव आहे.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
चांदीच्या भावात घसरण
चांदीच्या भावात आजही घसरण कायम आहे. 80,000 रुपयांचा भाव पार केल्यानंतर आज चांदीचा भाव 77,200 रुपयांवर आहे. काल चांदीचा भाव हाच होता.
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.