पुणे: लगीनसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. तसेच आगामी काळात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जगाच्या पाठीवर अमेरिकन बँकानी आपले व्याज दर केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळविला आहे. परिणामी सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली असून सोन्याचे दर 67700 रुपये प्रति 10 ग्रॅम इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.
दरम्यान या वाढत्या भावाचा फायदा घेण्यासाठी अनेक ग्राहकांनी आपल्याकडील सोन्याची मोड करत फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. ग्राहकांचा वाढत्या मोडीकडे कल पाहता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सोने व्यवसायिकांनी प्रति तोळा दोन हजार रुपयांची घट लावली आहे.
सोन्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता
जळगावमध्ये सोमवारी सोन्याचे दर 65700 प्रति तोळा तर, जीएसटीसह सोन्याचा दर 67700 प्रति तोळा इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. आगामी काळात आणखी सोन्याच्या भावात वाढ होण्याचा अंदाज सोने व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.