नवी दिल्ली: जर तुमच्याकडे 10 वर्षे जुने आधार कार्ड असेल आणि ते या कालावधीत एकदाही अपडेट केले गेले नसेल, तर सरकारने असे आधार अपडेट करण्यासाठी 14 जून 2024 पर्यंतची मुदत सरकारने दिली आहे. पण, त्याआधीच सरकारने त्यात बदल केला आहे. आता आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर असणार आहे. आधार अपडेट करण्यासाठी सरकारने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे. अशा परिस्थितीत, शक्य तितक्या लवकर आपले आधार कार्ड अपडेट करणे आपल्यासाठी चांगले आहे. तुम्ही घरी बसूनही तुमचा आधार मोबाईलद्वारे अपडेट करू शकता.
अद्ययावत करण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता
आधार अपडेटसाठी तुम्हाला दोन महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. पहिले ओळखपत्र आणि दुसरा रहिवासी पत्त्याचा पुरावा. आधार अपडेटसाठी आधार केंद्रावर सहसा ५० रुपये शुल्क आकारले जाते, परंतु UIDAI नुसार, ही सेवा १४ जूनपर्यंत मोफत आहे. तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड आणि पत्त्यासाठी मतदान कार्डचा देखील वापर करू शकता.
घरी बसून असे अपडेट करा तुमचे आधार कार्ड
- मोबाइल किंवा लॅपटॉपवरून UIDAI वेबसाइटवर जा.
- यानंतर अपडेट आधारच्या पर्यायावर क्लिक करा.
- आता आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे लॉग इन करा.
- यानंतर डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करा आणि व्हेरिफाय करा.
- आता खालील ड्रॉप लिस्टमधून ओळखपत्राची स्कॅन केलेली प्रत आणि पत्ता पुरावा अपलोड करा.
- आता सबमिट वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट क्रमांक मिळेल आणि फॉर्म सबमिट केला जाईल.
- तुम्ही रिक्वेस्ट क्रमांकावरून अपडेटची स्थिती देखील तपासण्यास सक्षम असाल.
- काही दिवसांनी तुमचा आधार अपडेट होईल.