नवी दिल्ली : भारतात सध्या Indigo, Air India यांसारख्या विमान कंपन्या आहेत. अनेक वर्षांपासून या विमान कंपन्यांचे विमान क्षेत्रात अस्तित्व आहे. पण, आता या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी दुबईची विमान कंपनी विमान क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. FlyDubai असे या विमान कंपनीचे नाव आहे.

FlyDubai ही दुबईतील नामांकित अशी विमान कंपनी आहे. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या इंडिगो आणि टाटा समूहाच्या एअरलाईन कंपनी एअर इंडियाला टक्कर देण्यासाठी ही नवी कंपनी भारतात आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने अडचणीत सापडलेल्या देशांतर्गत विमान कंपनी Go First चे अधिग्रहण करण्यात इच्छा व्यक्त केली आहे. जर सर्व काही सुरळीत झाले आणि हा करार निश्चित झाला, तर भारतातील Indigo, Air India, Vistara आणि इतर विमान कंपन्यांना नवा स्पर्धक मिळणार आहे.
FlyDubai भारतातील व्यवसायात थेट प्रवेश करणार नाही तर Busy Bee Airways च्या सहकार्याने Go First घेण्याचा विचार करत आहे. Go First चे ट्रेडमार्क, फ्लाईंग लायसन्स आणि विमानतळ स्लॉट खरेदी करण्यासाठी Busy Bee आधीच चर्चेत आहे.








