नवी दिल्ली : तुम्ही जर चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Vivo ने नवा स्मार्टफोन आणला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरीसह AI फीचर्स मिळत आहेत. यामध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. Vivo V50 स्मार्टफोन हा Vivo V40 चा अपग्रेडेड मॉडेल असणार आहे.

Vivo ने मिड-रेंज स्मार्टफोन सीरीज Vivo V50 भारतात लाँच केली आहे. Vivo V50 स्मार्टफोन हा Vivo V40 चा अपग्रेडेड मॉडेल असून, जो गेल्या वर्षी लाँच करण्यात आला होता. या नवीन स्मार्टफोनमध्ये अनेक महत्त्वाचे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, एआय फीचर्सला सपोर्ट करण्यात आला आहे. हा फोन लोकप्रिय स्मार्टफोन्स OnePlus 12R, iQOO Neo 9 Pro ला टक्कर देऊ शकतो. हा फोन ग्लास बॅक पॅनलसह आणण्यात आला आहे. या स्मार्टफोनची डिझाईनही चांगली अशी करण्यात आली आहे. Vivo V40 पेक्षा हा स्लीम असणार आहे. फोन 7.39mm जात असेल. तर वजन 199 ग्रॅम आहे.
Vivo V50 तीन स्टोरेज प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याच्या बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB मॉडेलची किंमत 34999 रुपये आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 36999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने 12GB रॅम आणि 512 GB स्टोरेज वेरिएंट देखील आणला आहे. ज्याची किंमत 40999 रुपये आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून विकला जात आहे. रोझ रेड, टायटॅनियम ग्रे आणि स्टाररी नाईट असे हे कलर असणार आहेत.

बेस्ट बॅटरी बॅकअप मिळतोय
या फोनमध्ये 6000mAh बॅटरी असून, जी युजर्सना पूर्ण दिवसाचा बॅकअप देऊ शकते. तसेच 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हे Android 15 वर आधारित FunTouchOS 15 वर काम करणार आहे. तसेच फोनमध्ये IP68+ IP69 वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शन रेटिंग देण्यात आली आहे.







