मुंबई : ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली. ओलाचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले. बाजार नियामक सेबीने फटकारल्यानंतर ‘ओला इलेक्ट्रिक’च्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ओलाचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले आणि IPO रेटच्या खाली आले.
ऑगस्ट 2024 मध्ये, ओलाचे शेअर्स 76 रुपयांच्या किंमतीला जारी करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी सेबीचे सूचनापत्र जारी केल्यानंतर, ओलाचे शेअर्स 4.74 टक्क्यांनी घसरून 75.41 रुपयांवर आले. इलेक्ट्रिक वाहन कंपनी ‘ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड’ला भारतीय बाजार नियामकाकडून फटकारले. ओला इलेक्ट्रिकने आपल्या विस्तार योजनांची घोषणा प्रथम एक्सचेंजेसऐवजी सोशल मीडियावर केली. त्यामुळे कंपनीला सेबीने इशारा दिला आहे.
एक्सचेंज फायलिंगनुसार, SEBI रेग्युलेशन, 2015 च्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याबद्दल ओला इलेक्ट्रिकला ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने 7 जानेवारी रोजी इशारापत्र पाठवले होते.
भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची वाढतीये मागणी
भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कारण, इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे खूप सोपे असून, त्याचा इंधन खर्चही नाहीच. लहान मुले आणि प्रौढ दोघेही स्कूटर सहजपणे चालवू शकतात. लाईटचे बिलही तुलनेने कमी येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या स्कूटर वापरण्याला प्राधान्य दिलं जातं.