मुंबई : शेअर बाजारात गुरुवारी प्रचंड वाढ झाली आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. यात सेन्सेक्स 490 अंकांनी वाढून 71,847 वर पोहोचला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स वाढीसह तर 12 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीनेही 141 अंकांची उसळी घेतली आणि 21,658 वर बंद झाला.
शेअर बाजारात मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये फेडरल बँक, ला ओपाला, कोरोमंडल इंटरनॅशनल, महिंद्रा हॉलिडेज, सीएमएस इन्फो सिस्टीम आणि अशोक लेलँड यांच्या शेअर्सनी वाढ नोंदवली तर पिडीलाइट, जेन्सॉल इंजिनिअरिंग, युनिफॉर्म इंडिया, आयएसएमटी लिमिटेड, फिनोलेक्स केबल, होम फर्स्ट फायनान्स आणि गेटवे डिस्ट्रिक्ट पार्कचे शेअर्स घसरले. आजच्या व्यवहारात बँकिंग, एफएमसीजी, एनर्जी, मीडिया आयटी, ऑटो, फार्मा, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस, कंझ्युमर ड्युरेबल्स सेक्टरमधील शेअर्स वाढीसह बंद झाले.
शेअर बाजारात सर्वाधिक वाढणाऱ्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स, टाटा कंझ्युमर, एनटीपीसी आणि ओएनजीसीचे शेअर्स होते. तर सर्वाधिक नुकसान झालेल्या शेअर्समध्ये बीपीसीएल, एलटीआय माइंडट्री, डॉ रेड्डीज लॅब्स आणि एचसीएल टेक यांच्या शेअर्सचा समावेश होता.