मुंबई : आधारकार्ड आणि पॅनकार्ड (PAN Card) हे महत्त्वाची कागदपत्रांपैकी एक आहे. भारतात कुठंही या दोन कार्ड्सची मागणी केली जाऊ शकते. पॅनकार्डशिवाय कोणतेही बँकिंग व्यवहार होऊ शकत नाही. त्यात आता केंद्र सरकारने 11.5 कोटी पॅनकार्ड बंद केले आहेत. पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
माहिती अधिकारातून याबाबत माहिती मागवण्यात आली होती. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) पॅनकार्ड कार्डशी लिंक करण्याची तारीख 30 सप्टेंबर होती. पण दिलेल्या मुदतीत दोन्ही कार्ड लिंक न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. देशात या पॅनकार्डची संख्या 70.24 कोटींवर पोहोचली आहे. 57.25 कोटी लोकांनी पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केले होते. जवळपास 12 कोटी लोकांनी ही प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण केली नाही. यापैकी 11.5 कोटी नागरिकांचे पॅनकार्ड बंद करण्यात आले आहे.
आता भरावा लागणार दंड
ज्या कार्डधारकांनी पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक केले नाही, अशांना एक हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. जेव्हा ते दंड भरतील तेव्हा बंद अर्थात निष्क्रिय झालेले कार्ड पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.