(Yerwada Crime) पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवासांपासून कोयता गॅंग (koyta gang) व चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. शहरात दररोज वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना समोर येत आहेत. अशातच येरवड्यातील शेलार चाळीतील नुमान कलेक्शन (clothshopes) हे कपड्यांचे दुकान फोडून चोरट्यांनी तब्बल १ लाख ३१ हजारांचे कपडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी टेरेसचा दरवाजा उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरीच्या या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.
याप्रकरणी येरवडा (yerwada police station) पोलीस ठाण्यात अजीजु खान (वय ४५) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, चोरट्यांनी मध्यरात्री दुकान फोडले आहे.
सव्वा लाखांचे कपडे चोरी…
पुण्यात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असताना पोलिसांना या घटना रोखता येत नसल्याचे वास्तव आहे. तक्रारदारांचे शेलार चाळ येथील फीश मार्केटमध्ये कपड्यांचे दुकान आहे. दुकान बंद करून गेल्यानंतर चोरट्यांनी टेरेसवरील दरवाजा उचकटून दुकानात प्रवेश केला. तसेच, नवीन १ लाख ३१ हजारांचे कपडे चोरून नेले.पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune Crime : धक्कादायक ! खाण्यातून विषारी औषध देत तीन कुत्र्यांचा केला खून
Shirur News : आमदाबाद विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न