Yawat News लोणी काळभोर : यवत (ता. दौंड) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४ अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. हि कारवाई जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी केली आहे.(Yawat News)
४ अट्टल गुन्हेगार तडीपार
सागर माधवराव दोरगे (वय-२७) अक्षय उर्फ बंटी ईश्वर यादव (वय-२५) हर्षल बाळासो जगताप (तिघेही रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) व विजय अनिल टेमगिरे (वय-२४, रा. भरतगाव ता. दौंड जि. पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाण्यात वरील चारही गुन्हेगार टोळी तयार करुन सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून गंभीर स्वरुपाचे गुन्हेगारी कृत्य करत होते. पोलिसांनी वेळोवेळी कायदेशीर कारवाई करुनही त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात फरक पडला नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.(Yawat News)
गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा म्हणून पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे आरोपींवर हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्फत पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्याकडे सादर करण्यात आला होता.(Yawat News)
दरम्यान, पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी वरील चारही गुन्हेगारांना जिल्हातून (पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हददीसह) १२ महिन्याच्या कालावधी करीता तडीपार करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुषंगाने पोलिसांनी वरील चारही आरोपींना तडीपार केले आहे.(Yawat News)
हि कामगिरी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने, महिला पोलीस अंमलदार सोनल शिंदे, पोलीस हवालदार महेश बनकर, लोखंडे, दौंडकर, राम जगताप, चांदणे व मारुती बाराते यांच्या पथकाने केली आहे.(Yawat News)