व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Monday, June 2, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या ४ अट्टल चोरट्यांना यवत पोलिसांनी केले जेरबंद ; पोलीस निरीक्षक नारायण पवार व सहकाऱ्यांची कामगिरी…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 10 July 2022, 11:46

यवत, (पुणे) : पुणे जिल्ह्यासह यवत परिसरात विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या चार जणांच्या अट्टल टोळीला यवत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

दत्ता अशोक शिंदे (वय २८, रा. राहु, ता. दौंड), विशाल मनोहर सोनवणे (वय-३० रा. सासवड, ता. पुरंदर), राज मच्छिंद्र वानखडे (वय- १९ ) महादेव उर्फ सोन्या कमलाकर पवार (वय-२९, रा. दोघेही केडगाव, ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून यवत पोलिसांनी ३ लाख ३६ हजार ७५० रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.

यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीभडक (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (ता. ०२) अज्ञात चोरट्यांनी १०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार सदर गुन्ह्याचा तपास यवत पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक करीत असताना शोध पथकातील पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड व अक्षय यादव यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, रोहित्र चोरी करणारी टोळी हि राहू (ता. दौंड) येथील शिवाजी चौक येथे येणार आहे.

त्यानुसार, गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी सापळा रचून संशयित एका चारचाकी गाडीतून जाताना दिसून आले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सदर घटनेबाबत चौकशी केली असता त्यांनी आणखी साथीदारासमवेत राहु, कानगाव, पाटस, कासुर्डी, बोरीभडक, खुटबाव, उंडवडी, कोरेगाव भिवर या परिसरातील २८ ठिकाणची रोहित्राच्या आतील तारा चोरून नेल्याची कबुली दिली.

दरम्यान, चोरी केलेला माल हा आमजद पाषामिया खान (वय ४०, रा. साईनगर, कोंढवा, ता. हवेली) याला विकल्याची माहिती आरोपींनी यावेळी दिली. पोलिसांनी सदर आरोपींकडून १ लाख ७६ हजार ७५० रुपये किंमतीच्या ३५० किलो तांब्याच्या तारा, गुन्हयात वापरलेल्या दोन चारचाकी गाड्या, एक दुचाकी, व चार मोबाईल असा ३ लाख ३६ हजार ७५० रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयाने ३ दिवसांची रिमांड कोठडी ठोठावली आहे.

सदरची कामगिरी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरू गायकवाड, गणेश कर्चे, सचिन गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव, रामदास जगताप, सुनील कोळी, पोलीस शिपाई प्रविण चौधर, मारूती बाराते, पोलीस मित्र निलेश चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दारूच्या व्यसनातून पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ; शिरूरमध्ये पतीविरोधात गुन्हा दाखल

Monday, 2 June 2025, 11:01

चिंता वाढली! राज्यात आता सर्वात जास्त सक्रिय रुग्ण पुण्यात, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Monday, 2 June 2025, 10:47

“पुणे ट्रॅफिक अ‍ॅप” द्वारे नागरिकांना करता येणार वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकाची तक्रार

Monday, 2 June 2025, 8:59

नाशिक हादरले! प्राचार्याने मुलींच्या छातीवर, पाठीवर हात फिरवून अश्लील स्पर्श केला अन् केली शरीर सुखाची मागणी

Monday, 2 June 2025, 8:22

Today’s Horoscope: यश मिळवायचे असेल तर प्रयत्न करावे लागणार, ‘या’ राशींना कष्ट करण्याची गरज

Monday, 2 June 2025, 7:51

‘हे’ 10 व्हिटॅमिन्स तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या कोणते?

Sunday, 1 June 2025, 23:09
Next Post

"अनगर" चे मालक भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर, आषाढी वारीनंतर सोलापुर जिल्हात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार?. फेसबुकच्या माध्यमातुन धाकट्या "युवराजां"चे भाजपा प्रवेशाचे संकेत...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.