राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : बारामती पाटस मार्गावरील रोटी घाटात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकी चालकाला अडवून १ हजार २०० रुपये रोख रक्कम व अनुक्रमे ८ हजार व ६ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण १५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली आहे.
यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बारामती-पाटस रोडने दोघे दुचाकीवरून येत होते. (Yavat News) पाटस गावच्या हद्दीत रोटी घाट उतरत असताना पाठीमागून मोटार सायकलवरून आलेल्या व्यक्तींनी मोटारसायकल आडवी लावून, दुचाकीवर असलेल्या दोघांना मारहाण केली. जबरदस्तीने त्यांच्याकडून दुचाकीची चावी काढून घेत, फेकून दिली. त्यांच्याकडील १ हजार २०० रुपये रोख रक्कम व अनुक्रमे ८ हजार व ६ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण १५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल बळकावला. त्यानंतर मोटारसायकलवरून घाट उतरून पाटस रोडने ते पळून गेले.
याबाबतची फिर्याद मधुकर बाबूराव जाधव (रा. हंबरापूर, ता. वैजापूर, जि. संभाजीनगर) यांनी ३ ऑक्टोबर रोजी यवत पोलीस स्टेशन येथे दिली आहे. (Yavat News) यावरून चार अज्ञात चोरट्यांविरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : यवत पोलीस स्टेशनतर्फे शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन