Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : पाईपलाईन फोडल्याचा जाब विचारताच शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; यवत पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 May 2026, 11:09

Yavat News यवत , ता. ८ : शेताच्या बांधावरून सुरू असलेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ट्रॅक्टरने पाण्याची पाईपलाईन फोडल्याचा जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यावर त्याच्याच चुलत भावाने लाकडी काठीने डोक्यात जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना पिलानवाडी (ता. दौंड) येथे ५ मे रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यावर सध्या बोरीपार्धी येथील निरामय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. Yavat News

विजय गुलाब कदम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संतोष उत्तम कदम (वय ४२, रा. पिलानवाडी, राहू, ता. दौंड) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष कदम हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. संतोष कदम हे घराच्या पाठीमागे ट्रॅक्टरचा आवाज आल्याने ते शेताकडे गेले. त्यावेळी त्यांचा चुलत भाऊ विजय गुलाब कदम हा ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेताच्या बांधालगत नांगरणी करत होता. याच वेळी संतोष कदम यांच्या घराजवळील पाण्याची पाईपलाईन फुटलेली दिसून आली. Yavat News

याबाबत संतोष कदम यांनी विजय कदम याला जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करत दमदाटी सुरू केली. “तुझा काही संबंध नाही,” असे म्हणत वाद वाढला. संतोष कदम यांनी “ही माझी शेती आणि माझा बांध आहे,” असे सांगितल्यावर संतापलेल्या विजय कदम याने जवळ पडलेली लाकडी काठी उचलून संतोष कदम यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात संतोष कदम गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. त्यानंतर आरोपीने पुन्हा धमक्या देत घटनास्थळावरून पलायन केले.

 

जखमी अवस्थेत संतोष कदम यांनी प्रथम यवत येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र, डॉक्टरांनी सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बोरीपार्धी येथील निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात विजय गुलाब कदम याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. Yavat News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे विटा टाकण्याच्या वादातून सख्ख्या भावावर विटांनी हल्ला; पत्नीसह पती जखमी, बाप-लेकावर गुन्हा दाखल..

Monday, 15 June 2026, 17:13

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! स्वारगेट एसटी स्थानकातील कॅन्टीनवर एफडीएचा ‘धडक’ छापा

Monday, 15 June 2026, 17:04

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे आरक्षण सोडत पूर्ण: ९ पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव

Monday, 15 June 2026, 16:55

मुंबई-पुणे अवघ्या 48 मिनिटांत! भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; हाय-स्पीड प्रकल्पाचा सविस्तर प्लॅन

Monday, 15 June 2026, 16:48

माळशिरस दुर्घटना! काळाने आठ जणांना हिरावले; पण इरफान मुजावर सात जणांसाठी ठरला देवदूत..

Monday, 15 June 2026, 16:46

“कुणी बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” निवडणुकांचा पत्ता नाही, पण पूर्व हवेलीतील ‘भावी’ सदस्यांचा फिल्मी डायलॉग्स आणि रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुरळा

Monday, 15 June 2026, 16:40
Next Post

Kedgaon News : दोन पोती गव्हावरून भावांमध्ये तुफान राडा! यवत पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.