Yavat News दौंड : केडगाव (ता. दौंड) येथील ‛चुलतभावांवरील’ सशस्त्र हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.११) सायंकाळी उघडकीस आली होती. या हल्ल्याच्या पाठीमागचे कारण समोर आले आहे. (Yavat News) हातउसणे दिलेले २ लाख रुपये मागितल्याने ‛चुलतभावांवर’ हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Yavat News)
यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या हल्ल्यात हर्षल बाळासो गायकवाड व राहुल गायकवाड (दोघे रा. केडगाव ता. दौंड ) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर केडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मुख्य आरोपी सलमान जैनुद्दीन राजे व त्याचे सहा ते सात साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल गायकवाड याने आरोपी सलमान राजे याला हातउसणे स्वरुपात २ लाख रुपये दिले होते. त्यानंतर हर्षल याने हातउसणे दिलेल्या पैशाची मागणी आरोपीकडे केली होती. आरोपीला पैसे मागितल्याचा राग आल्याने त्याने कायमचा काटा काढण्याचा कट रचला.
दरम्यान, आरोपी सलमान राजे याने पैसे देतो म्हणून हर्षल गायकवाडला केडगाव (ता.दौंड जि.पुणे) या गावच्या हद्दीतील आयुष रेसिडन्सी बिल्डींगमधील पहिल्या मजल्यावर बोलावुन घेतले होते.
त्यानंतर फिर्यादी हर्षल गायकवाड व त्यांचा चुलत भाऊ राहुल गायकवाड असे आरोपीच्या हॉलमध्ये बसले असताना अचानकपणे आरोपी सलमान राजे व त्याच्या सहा ते सात साथीदारांनी कट रचून हातात कोयता व तलवारी घेवुन दोघांच्या डोक्यात, हातावर, पायावर, पाठीवर, जोरदार हल्ला केला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे करीत आहेत.