राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : पुणे जिल्ह्यातील यवत, जेजुरी, लोणी काळभोर, हडपसर, लोणीकंद यासारख्या विविध ठिकाणी १३ गुन्ह्यातील दुचाकी चोरी प्रकरणातील सराईत गुन्हेगारास यवत पोलिसांनी अटक केली.
यवत पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव सालू-मालू येथून घराशेजारी असलेल्या गोठ्यातून ३० हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर (एमएच. ४२ ए. एल ८७६५) अज्ञात चोरट्याने ३ जुलै रोजी चोरून नेली. (Yavat News) याबाबतचा गुन्हा यवत पोलीस स्टेशन येथे दाखल होता. या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही तपासणी व रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले असता शोध पथकाला सदरचा गुन्हा पवन चट्टान राठोड याने केला असल्याचे उघडकीस आले. यावरून शोध पथकाने सहजपूर फाटा येथून संशयित आरोपी पवन चट्टान राठोड (वय २७ रा.म्हातोबाची आळंदी ता.हवेली जि.पुणे) यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.
पवन राठोड याने साथीदार कार्तिक अविनाश राठोड, भीष्म संतोष राठोड (दोघेही रा.जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे) यांच्या मदतीने यवत पोलीस स्टेशन हद्दीतून ४, जेजुरी व लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतून प्रत्येकी ३, लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतून २ व हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतून १ असे एकूण १३ गुन्हे उघडकीस आले. (Yavat News) आरोपीकडून ६ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या. पवनचे इतर दोन साथीदार कार्तिक अविनाश राठोड व भीष्म संतोष राठोड हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सध्या ते फरार असून, पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, पोलीस नाईक विकास कापरे, विशाल जाधव, पोलीस शिपाई मारुती बाराते, भारत भोसले, सुनील कोळी यांच्या पथकाने केली .
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : मिरवडी येथे शिक्षकांचा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान
Yavat News : पीएमपीएलचे दैनिक पास उद्यापासून पुन्हा सुरू, ७० ऐवजी १२० रुपये द्यावे लागणार