Yavat News वाखरी (ता. दौंड) येथे महावितरणच्या भरारी पथकाने छापा मारून तब्बल ८ लाख रुपयांची वीजचोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात हॉटेल व्यावसायिकासह जागा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Yavat News)
यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
संतोष सुभाष निंबाळकर व इकबाल माहिन कुन्ही शेख (दोघेही रा. वाखारी, ता. दौंड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महावितरणचे किशोर रमेश शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Yavat News)
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाखारी गावच्या हद्दीतील ओम साई हॉटेल आहे. या हॉटेलचे जागामालक संतोष निंबाळकर तर वीज वापरदार इकबाल शेख आहेत. महावितरणच्या भरारी पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता, सदर वीजचोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. (Yavat News)
दरम्यान, शेख यांनी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०२३ या कालावधीत महावितरणचे ४५ हजार ८९४ युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले आहे. यामुळे महावितरणचे तब्बल ७ लाख ७३ हजार ३७० रुपयांचे नुकसान झाले आहे.(Yavat News)
याप्रकरणी महावितरणचे अधिकारी किशोर शिंदे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जागामालक संतोष निंबाळकर व हॉटेल व्यावसायिक इकबाल शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कापरे करीत आहे.(Yavat News)