राहुलकुमार अवचट
Yavat Crime : यवत : यवत, केडगाव, कुसेगाव व सहजपुर येथील अवैध हातभट्टी धंद्यांवर यवत पोलिसांनी छापे टाकले आहेत. या छाप्यात पोलिसांनी तब्बल ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर ६ जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईमुळे यवत पोलिसांचे होतेय सर्वत्र कौतुक
अविनाश अंतरात्मा गुडदावत (वय-२६), ज्योती संतोष गुडदावत (वय-३६), सिमा सलदेव गुडदावत (वय-३५, दोघी रा.सहजपुर, माकरवस्ती ता.दौंड), दिवराज शामु बिरावत (वय-१९, गाडमोडी, खामगांव ता.दौंड), नंदीनी संजय राठोड (वय-२४ रा. कुसेगाव) आणि विष्वा बलराम नानावत (रा.केडगाव, २२ फाटा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.(Yavat Crime)
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत यवत येथील भुलेश्वर पायथा,यादव वस्ती येथे शेतामध्ये आरोपी अविनाश अंतरात्मा गुडदावत (वय २६) हा गावठी हातभट्टी चालवत असल्याचे आढळून आला. (Yavat Crime) त्याच्याकडून हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे ४२०० लिटर कच्चे रसायन इतर साधने, ३५ लिटर तयार दारू असा एकुण ९८,२५० रुपयांचा मुद्देमालासह हस्तगत करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत सहजपुर गावच्या हद्दीतील बोरा ग्रुप कंपनीच्या शेताजवळील सरकारी कालव्याच्या बाजूला चोरून वीज वापरून आरोपी ज्योती संतोष गुडदावत (वय ३६), सिमा सलदेव गुडदावत (वय ३५ दोघी रा.सहजपुर, माकरवस्ती ता.दौंड) व दिवराज शामु बिरावत (वय १९ रा.गाडमोडी, खामगांव ता.दौंड) हे ९३०० लिटर कच्चे रसायन, १०५ लिटर तयार दारू असा एकूण २ लाख १६ हजार ७५० रुपये किंमतीचा मुद्देमालसह आढळून आले. (Yavat Crime)
तिसऱ्या घटनेत कुसेगाव येथे गावच्या हद्दीतील शेत जमिनीत आरोपी नंदीनी संजय राठोड (वय-२४ रा. कुसेगाव) ही १४ हजार किंमतीची नवसागर, बिबे, गुळ, झाडाची साल मिश्रित ४०० लिटर गावठी हातभट्टी गाळण्याचे काम करत असताना मिळुन आली.
चौथ्या घटनेत केडगाव गावाच्या हद्दीतील २२ फाटा येथील ओढ्याच्या कडेला आरोपी विष्वा बलराम नानावत (रा केडगाव २२ फाटा) ही बेकायदा बिगरपरवाना गावठी हातभट्टी तयार करण्याचे साहीत्य जवळ बाळगुन ४ हजार लिटर कच्चे रसायन व इतर साधने एकुन ७६ हजार ५०० किंमतीचा मुद्देमालासह गावठी दारू तयार करीत असताना आढळून आली. (Yavat Crime) परंतु पोलीस येण्याची चाहूल लागतात सदर महिला ओढ्याच्या कडेला असलेल्या काट्यात पळून जाण्यात यशस्वी झाली.
दरम्यान, यवत पोलिसांनी एकाच वेळेस चार वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये जवळपास ४ लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ४ महिलांसह २ पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Yavat Crime) यवत पोलिसांनी केलेल्या या कारवाई त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat Crime : नांदगावात शेतात काम करत नाही म्हणून एकाला मारहाण; यवत पोलीसात गुन्हा दाखल…