Pune Crime : पुणे : ‘मकोकां’तर्गत तुरुंगात ( jail under Makoka) असलेल्या मित्राला जामिनावर (bail out a friend who is in jail) बाहेर काढण्यासाठी पैशांची गरज (needed money) असल्याने चोरी करणाऱ्या तीन आरोपींना ( arrested three accused) कोंढवा पोलिसांनी (Kondhwa police) अटक केली आहे. (Pune Crime)
हसन मगदुम बादशाह ईटगी (१८, रा. कात्रज), तेजस दीपक सणस ऊर्फ चिक्या (वय १९, रा. कात्रज) आणि आदित्य राजू नाडे (वय १८, रा. कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ऋषीकेश गाडे ऊर्फ हुक्या हा आरोपी सध्या ‘मकोकां’तर्गत तुरुंगात आहे. त्याला जामिनावर बाहेर काढण्यासाठी आरोपींनी चोरी केल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून ३७ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी मध्यरात्री कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शत्रुंजय जैन मंदिर येथे चोरीची घटना घडली होती. मंदिराचे व्यवस्थापक राजकुमार बन्सीलाल राजपुत यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. पोलिसांकडून तपास सुरू असतानाच आरोपी इस्कॉन मंदिराच्या पाठीमागील पाण्याच्या टाकीजवळ थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली.
दरम्यान, त्यानुसार पथकाने सापळा रचून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने मंदिरातील दानपेट्या फोडल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला आणि साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून ३७ हजार २१२ रुपये जप्त केले.
सदरची कामगिरी कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले, उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, अंमलदार सूरज शुक्ला, अनिल बनकर, सतीश चव्हाण, नीलेश देसाई, गोरखनाथ चिनके, ज्योतीबा पवार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.