वर्धा : चाकूचा धाक दाखवून १३ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून धावत्या गाडीत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुलगाव (जिल्हा. वर्धा) शहरात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सुमेध मेश्राम आणि एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ही शाळेत चालली होती. शाळेसमोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली असता आरोपी सुमेध मेश्राम याने आवाज दिला आणि चाकूचा धाक दाखवून तिला जबरदस्ती चारचाकी वाहनात बसवले. आरोपी सुमेध मेश्राम याने पीडितेवर धावत्या कारमध्ये बळजबरीने अत्याचार केला. आणि सदर प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर पीडित मुलीने सदर प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने ताबडतोब पुलगाव पोलीस स्थानक गाठले. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सुमेध मेश्राम आणि एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पुलगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरोधात कडक कारवाई केली जाईल. असे पुलगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शैलेश शेळके यांनी सांगितले आहे.