संतोष गायकवाड
Wagholi News वाघोली : वाघोली येथील पंचगंगा ॲग्रोटेक कंपनीच्या गोडावूनच्या पत्र्याचे लिकेज काढणे व नूतनीकरणाचे काम करताना कामगाराचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ठेकेदार व अन्य एकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ जुलै रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली होती. (Wagholi News)
संतोष विलास नागुराम (वय ४७, देहूरोड) असे गोडाऊनमध्ये मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव असून, याप्रकरणी राजटेक कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर विक्रांत अतुल काकडे (वय ४२, रा. चिंचवड) व दिलीपकुमार नित्यानंद नियोग (वय ६१, रा. देहु) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Wagholi News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदाराने काम घेतलेल्या गोडाऊनचे पत्र्याचे लिकेज काढणे व रेन्यूएशन करणे धोकादायक असतानासुद्धा त्यासाठी लागणारी सेफ्टी बेल्ट, हेल्मेट व इतर सुरक्षिततेची साधने पुरविली नाहीत. काम करत असताना संतोष नागुराम या कामगाराचा मृत्यू झाला होता. (Wagholi News)
याप्रकरणी आता दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोनू नागुराम यांनी फिर्याद दिली आहे. (Wagholi News)