Wagholi Accident वाघोली : भरधाव डंपरने जोरदार धडके दिल्याने एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वाघोलीतील Wagholi Accident केसनंद फाट्यावर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता की डंपरने काही मीटर अंतर दुचाकीसह त्यांना फरफटत नेले. डोक्यावरून चाक गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. या अपघातानंतर अवघड वाहतूकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अशोक मार्तंड काळे व वर्षा अशोक काळे ( रा. कसबा पेठ, पुणे ) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. तर डंपर चालक भास्कर पंढरीनाथ कंद ( वय 51, रा लोणीकंद ) हा अपघातानंतर डंपर सोडून पळून गेला. हा डंपर स्वप्नील भूमकर यांच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद…
पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
काळे दाम्पत्य हे राहू तालुक्यातील वाळकी या गावी शेतीच्या कामासाठी निघाले होते. केसनंद फाट्यावर ते चौकातून राहू रोडकडे वळत होते. पाठीमागून आलेल्या भरघाव डंपरने दुचाकीला धडक देत पुढे फरफटत नेले. दुचाकीसह दाम्पत्य डंपरमध्ये अडकले होते. सिग्नलच्या पुढे वर्षा या रस्त्यावर पडल्या तर अशोक हे पुढे फरफटत गेले. दोघेही चाकाखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या छातीवरील भागाचा चेंदामेंदा झाला. भर चौकात अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली. डंपर चालक अपघातानंतर पळून गेला. बाजूलाच वाघोली पोलीस चौकी असल्याने तेथील अधिकारी, कर्मचारी यांनी त्वरित धाव घेत दोघांचे मृतदेह रुग्णवाहिका बोलावून रुग्णवाहिकेत ठेवले.
यानंतर ज्या ठिकाणी त्यांच्या अवयवाचा चेंदामेंदा झाला होता व रक्त सांडले होते. तो भाग पाणी मारून स्वच्छ करण्यात आला. यानंतर वाहतूक व लोणी कंद पोलिसानी वाहतूक सुरळीत केली. काळे हे पोलीस सेवेतून निवृत्त झाले होते. ते सध्या शेतीच्या कामाकडे लक्ष देत होते. तर वर्षा या गृहिणी होत्या. या दाम्पत्याला दोन मुले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Road Accident | दौंड-सिद्धटेक रोडवर अपघात; भरधाव दुचाकीची पती-पत्नीस धडक