Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केतन अग्रवाल हत्याकांडातील सिया गोयलला तुरुंगात VIP ट्रीटमेंट?; रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाच्या आरोपांनी खळबळ, चौकशीची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 August 2026, 9:35

पुणे : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध लोहगड येथे घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल ही सध्या तुरुंगात असून, तिला पैशांच्या व प्रभावाच्या बळावर विशेष ‘व्हीआयपी सुविधा’ दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाने केला आहे.

बुधवारी पुण्यातील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला राहुल डंबाळे, अपर्णा दुबे, अॅड. जावेद जमादार, रुद्राणी जावळकर, कैलास देवकर, उषा आवळे आणि राहुल नागटिळक उपस्थित होते. आरोपींना जेलमध्ये अशा सवलती मिळणे हे पोलीस तपास यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पोलीस प्रशासनाने कोणत्याही बाह्य दबावाला बळी न पडता या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करावा आणि न्यायालयात भक्कम पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल करावे, अशी मागणी पक्षाने केली आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी हा खटला ‘फास्ट ट्रॅक कोर्टात’ चालवून आरोपींना फाशी किंवा जन्मठेपेची कडक शिक्षा व्हावी. तसेच तुरुंगात सवलती देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा घटनाक्रम:

 

18 जून: केतन अग्रवाल लोहगडावर पाय घसरून दरीत पडल्याचा बनाव रचण्यात आला. मात्र, मृतदेह बाहेर काढणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या संशयानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे हलवली.

21 जून: सर्व विधी पार पडल्यानंतर कुटुंबीयांनी लोहगडावर जाऊन पाहणी केली आणि हा अपघात नसून हत्येचा कट असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला.

बहिणीचा संशय: केतनची बहीण संजना हिने संशयित आरोपी सिया गोयल हिच्याकडे गडावरील घटनाक्रमाबाबत व फोटोग्राफीबाबत सविस्तर विचारणा केली असता सियाची उत्तरे संशयास्पद आढळली.

कॉल डिटेल्सचा पर्दाफाश: तपासादरम्यान आरोपी सिया आणि चेतन चौधरी यांच्यात गेल्या वर्षभरात तब्बल 2004 वेळा फोन संभाषण (300 हून अधिक तास) झाल्याचे CDR वरून उघडकीस आले.

सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा: 18 जून रोजी भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घातलेला एक तरुण लोहगडाच्या सीसीटीव्हीत आढळला, जो सियाला खुणा करत होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने स्वतःचा मोबाईल दुकानातील कामगाराकडे ठेवला होता.

अटक आणि कबुली: 22 जूनच्या रात्री पुणे ग्रामीण पोलिसांनी चेतनला (तेजस) ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच संपूर्ण हत्येचा कट आणि सियाचा सहभाग उघड झाला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54

टॅटूने उलगडलं खुनाचं गूढ! कल्याणीची हत्या, मृतदेहाचे 9 तुकडे कालव्यात; सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

Tuesday, 29 September 2026, 18:50

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26

दोन वर्षांखालील मुलांच्या अन्नपदार्थांबाबत तुकाराम मुंढेंचे कडक आदेश; नवीन नियम लागू

Tuesday, 29 September 2026, 18:22
Next Post

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या; एक जिवंत काडतूस जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp