Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गाववालो… सुसाइड… म्हणीत कदमवाकवस्ती येथे तरुण चढला पाण्याच्या टाकीवर ; ‘शोले स्टाईल’ आत्महत्या करण्याची धमकी…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 18 August 2022, 15:17

लोणी काळभोर, (पुणे) : गाववालो… सुसाइड… म्हणीत कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (ता. १८) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

त्यामुळे कदमवाकवस्ती व लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांना शोले चित्रपटातील वीरूची आठवण येथील ग्रामस्थांना झाली. त्याचा अभिनयही अभिनेता धर्मेंद्रच्या तोडीचा होता. मात्र, त्याची मागणी पूर्ण होण्याऐवजी लोणी काळभोर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुण हा कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील समतानगर परिसरात त्याच्या बहिणीकडे राहत आहे. बहिनेने त्याला जेवायला उशिरा देते असे म्हणल्याच्या कारणावरून तरुणाने टाकीवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्याने हा प्रयत्न का केला याबाबत माहिती मिळू शकली नाही.

गुरुवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास एक तरुण पाण्याच्या टाकीवर चढला. सुरुवातीला रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. नंतर त्याने आरडाओरडा करण्यास सुरवात केली. ‘मी उडी टाकतो… मला मरायचे आहे.’, असे म्हणत आरोळ्या दिल्याने गर्दी जमली. त्यातील काही नागरिकांनी त्याला खाली येण्याची विनंती केली मात्र ‘त्याने वर कोणी आले, तर मी उडी टाकेन’, अशी धमकी दिली. घडल्या प्रकाराने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी लोणी काळभोर पोलिसांना फोन करून माहिती दिली. सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार घनश्याम आडके व ईश्वर भगत घटनास्थळी पोहोचले.

दरम्यान, तरुणाने सदर ठिकाणी नागरिकांना उडी टाकत असल्याचे भासविले. प्रत्यक्षात दोन्ही हातांनी टाकीचे लोखंडी कठडे घट्ट धरून ठेवले होते. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत सदर ठिकाणी तत्काळ पोहचून तरुणाची समजूत काढली व टाकीवरून खाली उतरविले. मात्र त्याने हा प्रयत्न का केला याबाबत माहिती मिळू शकली नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

खांबील पोकळे येथे रान गव्यांच्या हैदोस ; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, तर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.