बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराड सध्या जेलमध्ये आहे. मात्र 2024 पासून संपूर्ण जिल्ह्यात कराडची दहशत आहे. याबाबत आता बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वाभार बोर्डे यांनी दिलेल्या जबाबाने खळबळ उडाली आहे. वाल्मीक कराड जेलमध्ये असला तरी त्याच्या कार्यकर्त्यांकडून बीड उपविभागात दहशत कायम असल्याचा जबाब त्यांनी दिला आहे.
९ डिसेंबर २०२४ रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या झाली. याच गुन्ह्यात वाल्मीक कराडला ३१ डिसेंबर २०२४ रोजी ताब्यात घेतल्याचा दावा उपअधीक्षक गोल्डे यांचा आहे. परंतू तेव्हा त्याला खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. साधारण १५ दिवसानंतर कराडला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी केले होते. गोल्डे यांच्या या जबाबामुळे संभ्रम आणि नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कराड खुनाच्या गुन्ह्यात आगोदरच आरोपी होता, हे पोलिसांना माहिती होते तर एवढे दिवस ही बाब का लपवली ? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
दरम्यान वाल्मीक कराड हा गुन्हेगार असताना देखील स्वतः सोबत पोलीस ठेवायचा त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले होते.याचा सुद्धा उल्लेख त्यांनी जबाब केला आहे. तसेच त्याला सिटी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं तेव्हा त्या पोलिस ठाण्याच्या बाहेर सुद्धा त्याच्या कार्यकर्त्यांनी दहशत पसरून दगडफेक करून गोंधळ घातला होता. आता देखील कराड तुरुंगात असतानाही बीडच्या उपविभागात त्याच्या समर्थकांची आणि त्याची दहशत कायम असल्याचा दावा बीडचे पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्ड यांनी केला आहे.