Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Matka Raid : उरुळी कांचन पोलिसांचा बाजार मैदानातील ‘कल्याण मटका’ अड्ड्यावर छापा ; चालकांसह 10 जुगारी रंगेहात पकडले, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 6 June 2026, 10:50

Uruli Matka Raid : उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजबजलेल्या बाजार मैदान परिसरात एका इमारतीच्या पार्किंगमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या ‘कल्याण मटका’ नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत मटका बुक लिहून घेणाऱ्या मुख्य चालकांसह एकूण 10 जणांना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले आहे. Uruli Matka Raid 

आरोपींकडून मटक्याची स्लिप बुक्स, कार्बन आणि रोख रक्कम पंचांसमक्ष जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे मटका चालकांचे धाबे दणाणले आहेत. शुक्रवारी (ता. 05) सकाळी साडेअकरा वाजता बाजार मैदान येथील शहा यांचे बिल्डिंगचे पार्किंग मध्ये हि कारवाई करण्यात आली. Uruli Matka Raid 

राजेंद्र केरु वाघमोडे (वय 57, रा. बोरीपार्धी, केडगाव, ता. दौंड) याच्या ताब्यातून आकडेमोड केलेले कागदाचे स्लिप बुक, निळा कार्बन आणि 1 हजार 310 रुपये रोख रक्कम तर अतुल अनिल टिळेकर (वय 30 ,रा. बाजार मैदान, उरुळीकांचन, ता. हवेली) याच्या ताब्यातून मटका स्लिप बुक आणि 420 रुपये रोख जप्त करण्यात आली. या कारवाईत मुख्य चालकांसोबतच मटका अड्ड्यावर जुगार खेळत असलेले मनोज अशोक कोऱ्हाळे (वय 32, रा. जय मल्हार रोड, उरुळी कांचन), राजेंद्र संभाजी वाघमारे (वय 60, रा. थेऊर, ता. हवेली), विजय रमेश जाधव (वय 34, रा. सटवाई चौक, उरुळी कांचन) Uruli Matka Raid 

गजानन अवधुत गेटे (वय 44, रा. शिंदवणे, ता. हवेली), धर्मा लक्ष्मण देढे (वय ४०, रा. इंदिरानगर, उरुळी कांचन), सोमनाथ अशोक बेलार (वय 42, रा. शिंदवणे, ता. हवेली), प्रभाकर विश्वनाथ सोनवणे (वय 54,रा. दिघी, जि. पुणे), गणेश शांताराम कांचन (वय 42, रा. बाजार मैदान, उरुळी कांचन, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई अक्षय कामठे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Uruli Matka Raid 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शासकीय वाहनातून हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलींग करत होते. यादरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, उरुळी कांचन गावच्या हद्दीत बाजार मैदान येथील ‘शहा’ यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये काही इसम कल्याण मटका नावाच्या जुगाराची साधने बाळगून लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवत आहेत. Uruli Matka Raid 

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने पार्किंगमध्ये पाहिले असता, तिथे दोन इसम हातामध्ये मटक्याची स्लिप बुक घेऊन उभे होते, तर त्यांच्या समोर 8 ते 9 जण मटक्याचे आकडे लावण्यासाठी गर्दी करून उभे होते. अचानक पोलिसांची एन्ट्री पाहताच जुगारांची चांगलीच तारांबळ उडाली मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत सर्वांना जागीच घेरून ताब्यात घेतले. Uruli Matka Raid 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, राजेंद्र वाघमोडे व अतुल टिळेकर याच्या ताब्यातून मटका स्लिप बुक व रोख रक्कम जप्त करण्यात आली. मुख्य चालकांसोबतच मटका अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी आलेल्या वरील 8 जणांनाही पोलिसांनी अटक केली आहे. Uruli Matka Raid 

दरम्यान, पोलीस ठाण्याचा नवीन पदभार अधिकाऱ्यांनी स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर झालेली ही पहिलीच मोठी कारवाई असल्याने, “हद्दीत जुगार, मटका आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांची यापुढे खैर नाही,” असा थेट संदेश पोलिसांनी दिला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खरात करत आहेत. Uruli Matka Raid 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post
two people detained for taking bribe in parbhnai

Msedcl Bribe Case : वीजमीटर जोडणीसाठी 2 लाखांची लाच घेताना महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp