Msedcl Bribe Case पुणे, ता. ६ : महावितरणच्या नवीन वीजजोडणीसाठी तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. देहूगावातील भैरवनाथ चौकात सापळा रचून ही कारवाई शुक्रवारी (ता.५) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. Msedcl Bribe Case

आरोपी गजानन बाळासाहेब चट्टे (वय ३५) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वायरमचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ३५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. Msedcl Bribe Case

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चट्टे हे महावितरणमध्ये वायरमन म्हणून येलवडी (ता. खेड, जि. पुणे) येथे कार्यरत आहे. तर तक्रारदार हे शासकीय इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत. येलवडी येथील एका महिलेच्या प्लॉटसाठी नवीन वीजमीटर बसविण्याचे काम त्यांच्याकडे आले होते. संबंधित महिलेच्या नावाने आवश्यक कागदपत्रांसह महावितरणकडे ऑनलाइन अर्ज करण्यात आला होता. Msedcl Bribe Case

अर्ज अपलोड झाल्यानंतर जागेचा सर्व्हे करण्यासाठी तक्रारदारांनी वायरमन गजानन चट्टे यांची भेट घेतली. त्यावेळी चट्टे यांनी संबंधित प्लॉटिंगमधील एकूण ११ प्लॉट्ससाठी वीजमीटर जोडणीचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्याबदल्यात दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.तक्रारदारांनी याबाबत ५ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान आरोपीने दोन लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. Msedcl Bribe Case
यानंतर सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. सायंकाळी ६.३२ वाजता देहूगाव येथील भैरवनाथ चौकात आरोपी गजानन चट्टे याने तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली असून, सर्वसामान्य नागरिकांना सेवा देताना लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील हे करत आहेत. Msedcl Bribe Case







