P I Shashikant Chavhan : पुणे, : कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच लक्ष्य करत एका दारूच्या नशेत असलेल्या तरुणाने थेट खडक पोलीस ठाण्यात धुडगूस घालत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या अंगावर थुंकणे, कॉलर पकडून मारहाण करणे, लाथाबुक्क्यांनी हल्ला करणे आणि “कोयत्याने फाडून टाकेन, ३०७ चा गुन्हा माझ्यासाठी नवीन नाही,” अशी उघड धमकी दिल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. P I Shashikant Chavhan

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई चंद्रशेखर शरणप्पा हुणचळगी (वय २६) यांनी फिर्याद दिली असून, रोहन गौतम साळवे (वय २६, रा. गुलटेकडी, पुणे) याच्याविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. P I Shashikant Chavhan

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई चंद्रशेखर हुणचळगी आणि सागर कांडीलकर हे फडगेट पोलीस चौकीच्या हद्दीत रात्रपाळीतील गस्त घालत होते. पहाटे दोनच्या सुमारास नियंत्रण कक्षामार्फत टिळक रोडवरील जयश्री हॉटेल सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार दोन्ही पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तेथे रोहन साळवे हा एका महिलेशी मोठ्याने वाद घालत होता. संबंधित महिलेचे मोबाईलवर चित्रीकरण करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. महिलेला जाब विचारल्यावर तो उलट, “तुमचे काही अश्लील व्हिडिओ काढले आहेत का?” असे म्हणत वाद घालत होता. P I Shashikant Chavhan

पोलिसांशीच हुज्जत; दारूच्या नशेत पोलीस ठाण्यात आणले..
पोलिसांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता तो पोलिसांशीच वाद घालू लागला. त्यामुळे त्याला पुढील चौकशीसाठी खडक पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी त्याच्या तोंडाला दारूचा तीव्र वास येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र, पोलीस ठाण्यात आणल्यानंतरही तो शांत होण्याऐवजी आरडाओरड करत गोंधळ घालू लागला. पोलिसांनी वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. P I Shashikant Chavhan
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवरही उगारली धमकी..
दरम्यान, सेक्टर नाईट राऊंडवर असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस ठाण्यात आले. त्यांनी आरोपीची विचारपूस करत तो दारूच्या नशेत आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केला असता, रोहन साळवे याने थेट पोलिसांच्या अंगावर थुंकण्यास सुरुवात केली. त्याला आवरण्याचा प्रयत्न करत असताना त्याने पोलीस शिपाई हुणचळगी यांची कॉलर पकडून उजवा हात पिरगळला आणि पायावर जोरदार लाथ मारून जखमी केले. त्यानंतर उपस्थित इतर पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही त्याने धक्काबुक्की व मारहाण केली. P I Shashikant Chavhan
“३०७ माझ्यावर आहे, तुम्हाला संपवायला वेळ लागणार नाही..”
यावेळी आरोपीने उघडपणे पोलिसांना धमकावत म्हटले, “माझ्यावर ३०७ चा गुन्हा आहे. पोलीस माझे काहीच वाकडे करू शकले नाहीत. तुम्हाला संपवायला मला वेळ लागणार नाही. कोयता किंवा चॉपरने फाडून टाकेन. कोर्ट-कचेरी माझ्यासाठी नवीन नाही. हेच काम मी रोज करतो.”इतकेच नव्हे, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनाही उद्देशून त्याने धमकीची भाषा वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. P I Shashikant Chavhan
यानंतर आरोपीला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी तो दारूच्या अंमलाखाली असल्याचे स्पष्ट केले असून रासायनिक तपासणीसाठी त्याचे रक्तनमुने जप्त करण्यात आले आहेत. मारहाणीत जखमी झालेल्या पोलीस शिपाई हुणचळगी यांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी रोहन साळवे याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील शासकीय कामात अडथळा, मारहाण, धमकी आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. P I Shashikant Chavhan
पोलीस ठाण्यातच दादागिरी; कायद्यालाच आव्हान?
सामान्य नागरिकांसाठी सुरक्षेचे केंद्र असलेल्या पोलीस ठाण्यातच पोलिसांवर हल्ला करण्याचे धाडस आरोपीने केल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस ठाण्याच्या चार भिंतीतच जर पोलिसांवर हल्ले होत असतील, तर सामान्य नागरिकांची सुरक्षा किती, असा सवाल उपस्थित केला जात आहे. P I Shashikant Chavhan







