Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 2 September 2026, 22:56

दौंड: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात महावितरणच्या वीज तपासणी मोहिमेदरम्यान वीजचोरीचा प्रकार समोर आला आहे. गाडेवाडी येथे एका घरात एलटी लाईनवरून थेट केबल टाकून वीज वापरली जात असल्याचे महावितरणच्या पथकाला आढळून आले. या प्रकरणी संदीप वामन लगड यांच्याविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणचे सहाय्यक अभियंता उमर हारून शेख यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, २४ ऑगस्ट रोजी दुपारी उमर शेख हे मुख्य तंत्रज्ञ मधुकर लगड, वरिष्ठ तंत्रज्ञ दादासाहेब मेंगावडे आणि विद्युत सहाय्यक अर्चना बांडाबुच्चे यांच्यासोबत दौंड ग्रामीण हद्दीतील गाडेवाडी येथे वीज जोडण्यांची तपासणी करण्यासाठी गेले होते.

तपासणीदरम्यान संदीप वामन लगड यांच्या घराजवळील एलटी लाईनच्या पोलवरून केबलचा आकडा टाकण्यात आल्याचे पथकाला दिसले. काळ्या रंगाची वायर थेट घरामध्ये जोडल्याचेही आढळून आले. पथकाने घरातील वीज वापराची तपासणी केली असता १.८६ किलोवॅटचा लोड आढळला.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दोन पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा केला. हा पंचनामा दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी सुरू करून ५ वाजता पूर्ण करण्यात आला. तपासणी अहवालानुसार, संबंधित घरात मागील १२ महिन्यांपासून वीजचोरी होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या काळात एकूण १,८६६ युनिट वीज चोरी झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. चोरी झालेल्या विजेची किंमत ३६ हजार ८२० रुपये असल्याचे महावितरणच्या अहवालात नमूद आहे. वीजचोरीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे २० फूट लांबीची काळ्या रंगाची केबलही पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी संदीप वामन लगड यांच्याविरोधात भारतीय विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३५ अंतर्गत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, महावितरणच्या एलटी लाईनवरून थेट केबल टाकून कंपनीची वीज अनधिकृतपणे वापरण्यात आल्याचा आरोप आहे.

दौंड पोलीस ठाण्यात २ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजून ४९ मिनिटांनी एफआयआर नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट!लता, सुशील हगवणे आणि नीलेश चव्हाण यांना कोर्टाचा दिलासा,कडक अटी शर्थीसह जामीन…

Friday, 6 November 2026, 11:06

रुग्णालयाचा पत्ता विचारायचा बहाणा अन् विद्यार्थ्याचा मोबाईल हिसकावला एमआयटी कॉलेजजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांचा धुमाकूळ

Friday, 6 November 2026, 10:49

पुण्यात स्वाइन फ्लूचा कहर! तब्बल 879 रुग्णांची नोंद,आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली…

Friday, 6 November 2026, 10:39

पोलीस भरती घोटाळा उघड करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; ऑडिओ क्लिपने खळबळ, घोटाळ्याचे धागेदोरे कुठंपर्यत?

Friday, 6 November 2026, 10:23

दोन वर्षांसाठी पुण्यातून हद्दपार, तरीही परतला! वाघोलीत कोयते घेऊन दहशत माजवणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

Friday, 6 November 2026, 10:20

दिवाळीच्या आनंदावर अपघाताचं विरजण! घराकडे निघालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थींच्या बसला अपघात, 15 जण जखमी

Friday, 6 November 2026, 10:14
Next Post

Daily Horoscope: 3 सप्टेंबरला ग्रहांची चाल बदलणार चित्र! या राशींना धनलाभासह करिअरमध्ये मोठे यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp