Uruli Kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : वाढदिवस साजरा करत असताना जुन्या वादातून आणि फोनवरील शिवीगाळीवरून हॉटेल व्यावसायिकाला आणि त्यांच्या कुटुंबाला सहा जणांनी मिळून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. सोमवारी (ता. 11) रात्री पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीतील पुरोगामी माध्यमिक विद्यालय जवळ हि घटना घडली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी एका महिलेसह सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. Uruli Kanchan
सुमित हरी चोपडे (वय-28 वर्ष व्यवसाय-हॉटेल व्यवसाय रा.आळंदी म्हातोबा, ता.हवेली) असे मारहाण झालेल्या व्यवसायिकांचे नाव आहे. चोपडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अक्षय अनिल कड, अजित अनिल कड, अजित संपत कड, प्रकाश बेलवाल, अनिकेत नितीन चौधरी, अंकिता अक्षय कड (सर्व रा. कडवस्ती, सोरतापवाडी ता. हवेली) यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Uruli Kanchan
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमित चोपडे हे सोरतापवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाजवळ ‘राधेकृष्ण प्युअर व्हेज’ हॉटेल चालवतात. सोमवारी रात्री पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास सुमित, त्यांचा मावस भाऊ सूरज, वहिनी मयुरी आणि मित्र परिवार सूरजचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलसमोर जमले होते. Uruli Kanchan
वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू असताना आरोपी अक्षय कड आणि अंकिता कड यांनी सुमित व सूरजला फोन करून शिवीगाळ व दमदाटी केली. “तुम्ही तिथेच थांबा आम्ही येतो,” असे म्हणून काही वेळातच आरोपी अक्षय कड, अजित कड, अजित कड, प्रकाश बेलवाल, अनिकेत नितीन चौधरी आणि अंकिता कड तिथे आले. Uruli Kanchan
आरोपी अक्षय आणि अजित अनिल कड यांनी लाकडी दांडक्याने सुमितला मारहाण केली. तर अजित कड, प्रकाश बेलवाल आणि अनिकेत चौधरी यांनी सुमित, सूरज व मयुरी यांना लाथाबुक्क्यांनी मारले. तर अंकिता कड हिने सूरजला शिवीगाळ करत कानाखाली चापट मारली. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. Uruli Kanchan
दरम्यान, सुमित चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९० आणि १९१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार लोखंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. Uruli Kanchan







