Uruli Kanchan | उरुळी कांचन, (पुणे) : आजारपणाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर जाऊन बसलेल्या एका ६२ वर्षीय महिलेचा रेल्वे गेटमनने प्रसंगावधान दाखवत जीव वाचवला. कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. १०) मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
दिपाली राजकुमार सिंग (वय-६२, रा. कांचन गृह सोसायटी, कोरेगाव मूळ, ता. हवेली) असे महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिपाली सिंग या कोरेगाव मूळ परिसरात असलेल्या एका सदनिकेत त्यांच्या पतीसोबत राहतात. मंगळवारी रात्री दिपाली सिंग या आजारी होत्या. यावेळी पती राजकुमार सिंग यांच्यात किरकोळ करणावरून भांडणे झाली. त्यामुळे पतीच्या भांडणाला व आजारपणाला कंटाळून कोरेगाव मूळ येथील रेल्वे गेटवर आत्महत्या करण्यासाठी घरातून बाहेर पडल्या.
मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ या ठिकाणी रेल्वे कर्तव्यावर असलेले गेटमन यांना एक महिला रेल्वे रुळावर बसलेली दिसून आली त्यांनी तात्काळ रेल्वे गेटच्या शेजारी राहणारे समीर घावटे व सुप्रिया घावटे यांनी घराच्या बाहेर येऊन सदर महिलेला रेल्वे रुळावरून बाजूला घेतले. यावेळी सदर महिलेला आजारपणामुळे उठताही येत नव्हते. मात्र घावटे कुटुंबिय व रेल्वे गेटमनच्या सतर्कमुळे महिलेला बाजूला रेल्वे रुळावरून बाजूला घेतले.
सुप्रिया घावटे यांनी कोरेगाव मुळचे पोलीस पाटील वर्षा कड, सामाजिक कार्यकर्ते सचिन कड यांना फोन वरून सदर घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ सदर ठिकाणी आले. त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस हवालदार रमेश गायकवाड व राहुल माळगे आले. त्यांनी सदर महिलेची चौकशी केली असता त्या महिलेने तिचे नाव वरीलप्रमाणे सांगितले.
आजारपणाला कंटाळून आत्महत्या…
माझी तब्ब्येत माझी साथ देत नाही, दोन मुले असून एक मुलगा बेंगलोर या ठिकाणी अभियंता आहे तर दुसरा हा कमान रुगणालय या ठिकाणी कामाला आहेत. घरी नवरा बायको दोघेच राहतो. पती राजकुमार सिंग यांना वारंवार चांगले खायला लागते, त्यामुळे वारंवार माझ्याशी भांडणे करतात. माझ्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या करायला या ठिकाणी आले असल्याचे सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी सदर महिलेला तिच्या घरी समजावून सोडले आहे. रेल्वे गेटमन, स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासन यांच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!