Uruli Kanchan News उरुळी कांचन : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी व घरफोड्यांचे सत्र सुरूच आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी सोरतापवाडी व कुंजीरवाडी येथील तीन दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना ताजी असतानाच आता दोन चोरट्यांनी उरुळी कांचन (ता. हवेली) शहरातून फॉर्च्युनर कार चोरल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी (ता.५) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Uruli Kanchan News)
याप्रकरणी सागर पोपट कांचन (रा.उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कांचन यांनी नेहमीप्रमाणे त्यांची फॉर्च्युनर गाडी (क्र. MH १२ PH ०१०५) शुक्रवारी (ता.४) रात्री घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. दरम्यान, सागर कांचन यांना सकाळी उठल्यावर त्यांच्या पार्किंगमधील फॉर्च्युनर गाडी आढळून आली नाही. त्यानंतर सागर कांचन यांनी सीसीटीव्ही तपासले असता, शुक्रवारी मध्यरात्री २ च्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी फॉर्च्युनर गाडीचे लॉक उघडून गाडी घेऊन पळून गेले. (Uruli Kanchan News)
याप्रकरणी सागर कांचन यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रमेश गायकवाड करीत आहेत. (Uruli Kanchan News)
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे सत्र थांबता थांबेना !
कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे मेडिकल व हार्डवेअर दुकान फोडून चोरट्यांनी मंगळवारी (ता. १) रात्री रोख रक्कम चोरून नेली होती. ही घटना ताजी असतानाच, चोरट्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कलागोविंद कार्यालयाशेजारी असलेले एक स्नॅक्स सेंटर फोडून रोख रकमेसह साहित्य चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता. २) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे सत्र काही केल्या थांबता थांबेना असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Uruli Kanchan News)
ठिकठिकाणी सीसीटीव्ही असूनही कारवाई नाहीच
या परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्हीत चोरटे कैद होत आहेत. परंतु, पोलिसांना चोरटे मिळत नाहीत. म्हणून पोलिसांच्याच कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला जात आहे. (Uruli Kanchan News)