उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन परिसरातील शाळा, महाविद्यालयाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यावर उरुळी कांचन व परीसरातील रोडरोमिओंनी धिंगाणा घातला असून, येथील मुख्य चौक, शाळा, महाविद्यालय व खासगी क्लासेस, कॉलेज प्रवेशाजवळ आवारात टग्गे घोळक्याने उभे राहून शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनीची व रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या महिलांची छेडछाड काढण्याचे प्रमाण मागील काही दिवसापासुन वाढले आहे. रोडरोमियोंच्याकडुन होत असलेल्या छेडछाडीची माहिती उरुळी कांचन येथील महाविद्यालय व शाळांनी लोणी काळभोर पोलिसांना देऊनही, रोडरोमियोंचा धुडगुस थांबत नसल्याने उरुळी कांचनकर हैराण झाले आहेत.
उरुळी कांचन परिसरात अनेक शाळा-महाविद्यालय असून, अनेक क्लासही आहेत. येथे येणाऱ्या विद्यार्थिनींना रोडरोमियोंच्या छेडखानीला सामोरे जावे लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. उरुळी कांचन परिसरातील महादेव मंदिर, बी. जी शिर्के शाळा, महात्मा गांधी विद्यालयाशेजारी, कॉलेजच्या गेटच्या बाहेर, जिजाऊ सभागृह चौक, शिंदवणे चौक, या ठिकाणी रोडरोमियो दिसून येत आहेत. मोठ्या आवाजाच्या गाड्यांवर येऊन वेगवेगळ्या प्रकारचे बाईक स्टंट करणे, मोठमोठ्याने आरडाओरड करणे हे सततचे झाले आहे.
शाळेच्या आवारात तसेच परिसरात अनेक टवाळखोर मुले थांबलेली असतात. त्यातील काही मुलांचा शाळा अथवा महाविद्यालयांशी काहीही संबंध नसतो. मात्र, येथे येणाऱ्या विद्यार्थिनींची छेड काढण्यासाठी व त्यांना त्रास देण्यासाठी ही मुले घोळक्याने थांबलेली आढळून येत आहेत. हे रस्त्याने जाणाऱ्या मुलींना कट मारणे, दुचाकीवर तिघेजण बसून वारंवार त्याच रस्त्याने चकरा मारणे, मुलींना कट मारणे अशा घटना घडत आहेत. या घटनेमुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या रोडरोमियोंवर लोणी काळभोर पोलीस कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर एक नागरिक म्हणाले, ‘‘टवाळखोर मुले गाड्या सुसाट चालवितात. कर्कश हॉर्न वाजवतात, वाकड्यातिकड्या गाड्या चालविल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा बेशिस्तांवर पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. रोडरोमियो मुली ज्या ठिकाणी थांबलेल्या असतात, त्या ठिकाणी चकरा मारणे, दुचाकीवरून विनाकारण हॉर्न वाजवित जाणे, मुलींना पाहून शेरेबाजी करणे असे प्रकार सर्रासपणे करतात. यातील काही जण शहरातून धूमस्टाईलने दुचाकी पळवून दुचाकीचे कर्कश हॉर्न वाजवित विविध आवाज काढतात.’’ अशा आवाज काढणाऱ्या व ट्रिपल शीट फिरणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी उरुळी कांचन मधील पालकांनी केली आहे.
लोणी काळभोर पोलिस “थंड”च…
उरुळी कांचन व परीसरातील सर्वच शाळांच्या गेटवर रोडरोमियोचा धुडगुस ही बाब नवी राहिलेली नाही. मुलींना मुलांचा त्रास होत असला तरी, शाळा बंद होईल या भितीने मुली त्रास सहन करत असल्याचे चित्र सर्रास दिसुन येते. तर दुसरीकडे लोणी काळभोर पोलिसही त्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहात नसल्याचे व रोमिओगिरी कमी करण्याच्या दिशे्ने पावले उचलत नसल्याचे चित्र मागील काही काळापासुन दिसुन येत आहे. पोलिसांनी केवळ मनात आनले तरी, उरुळी कांचनच काय संपुर्ण लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीतील रोमिओगिरी बंद होऊ शकते. मात्र पोलिसच थंड पडल्याने, आलतु-फालतु टग्यांचा धुडगुड वाढला आहे.
याबाबत उरुळी कांचन येथील शौक्षणिक संकुलातील एक प्राध्यापक “पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना म्हणाले, “उरुळी कांचन परीसरातील अनेक शाळांच्या गेटबाहेर व शाळांच्याकडे येँणाऱ्या रस्त्यावर मागील कांही दिवसापासुन सकाळ-संध्याकाळ रोडरोमिओंचा धिंगाणा वाढला आहे. याबाबात शिक्षकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यास, रोडरोमिओ शिक्षकांना दमबाजी करत असल्याने शिक्षकही गप्प राहणे पसंत करत आहेत. तर दुसरीकडे शाळा व कॉलेजच्या प्राध्यापकांनी रोडरोमिओंच्याकडुन होत असलेल्या त्रासाची माहिती वारंवार लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना फोनद्वारे माहिती दिलेली. मात्र पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी आम्हालाच रोडरोमिओंचे फोटो काढुन पाठवा असे सांगुन, त्यांची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात.
याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर एक नागरिक म्हणाले, ‘‘टवाळखोर मुले गाड्या सुसाट चालवितात. कर्कश हॉर्न वाजवतात, वाकड्यातिकड्या गाड्या चालविल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा बेशिस्तांवर पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. रोडरोमियो मुली ज्या ठिकाणी थांबलेल्या असतात, त्या ठिकाणी चकरा मारणे, दुचाकीवरून विनाकारण हॉर्न वाजवित जाणे, मुलींना पाहून शेरेबाजी करणे असे प्रकार सर्रासपणे करतात. यातील काही जण शहरातून धूमस्टाईलने दुचाकी पळवून दुचाकीचे कर्कश हॉर्न वाजवित विविध आवाज काढतात.’’ अशा आवाज काढणाऱ्या व ट्रिपल शीट फिरणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी.
याबाबत बोलताना उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे म्हणाले, “उरुळी कांचन परिसरात पोलिसांची गस्त सुरूच आहे. मागील आठ दिवसांपूर्वी दोन बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी रोडरोमियो आढळून येत आहेत. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार असून अशा टवाळखोरांची गय केली जाणार नाही.” दरम्यान उरुळी कांचन पोलिस चौकीचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे यांनी कारवाईची हमी दिली असली तरी, उरुळी कांचन पोलिस चौकीचे यापूर्वीचे कामकाज पहाता हा इशारा पोकळ निघु नये एवढीच नागरीकांची अपेक्षा आहे.