Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील रिल्सस्टारला बदनामी करण्याची धमकी देऊन उकळले २ लाख रुपये ; शिंदवणे येथील तरुणावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 31 August 2023, 12:53

उरुळी कांचन, (पुणे) : इन्स्ट्राग्रामवर रिल्स स्टार असलेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका तरुणाला तू चोरीचे सोने घेऊन गोल्डन स्टार बनला असल्याची बदनामी करण्याची धमकी देऊन ३ लाख रुपयांची खंडणी मागून त्यापैकी २ लाख रुपये खंडणी उकळल्याची घटना घडली आहे. या घटनेने लोणी काळभोरसह पोरीसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी धर्मेंद्र (मोनू) बाळासाहेब बडेकर (वय – ३०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महेश ऊर्फ मल्लाप्पा साहेबान्ना होसमानी (रा. शिंदवणे, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ जानेवारी पासून आतापर्यंत घडला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू बडेकर हे उरुळी कांचन परिसरात राहत असून ते इन्स्टाग्रामवर रिल्स व्हिडिओ बनवितात. साडेचार लाख फॉलोवर्स आहेत. एका मित्राने आरोपी महेश याची ओळख करुन दिली. महेश याने फिर्यादी यांना सासुरवाडीला कार्यक्रम आहे, त्यासाठी एका दिवसासाठी सोन्याची चैन देण्याची विनंती केली. त्यानुसार फिर्यादी यांनी त्याला १८ तोळे वजनाची सोन्याची चैन दिली. काही दिवसांनी त्यांनी चैन परत मागितल्यावर ती गहाण ठेवली असून सोडविण्यासाठी २० हजार रुपये देण्याची मागणी केली.

फिर्यादी यांनी त्याला २० हजार रुपये दिले. तरीही चैन परत न केल्याने फिर्यादी यांनी ही बाब भावाला सांगितली. त्यांच्या भावाने माहिती काढल्यावर महेश होसमानी हा गुन्हेगार असून त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडून पोलिसांनी खूप सोने हस्तगत केले आहे, असे समजले. त्यानंतर फिर्यादी यांनी शिंदवणे येथे जाऊन त्याची भेट देतील तेव्हा त्याने उलट फिर्यादी यांना धमकावले. मी तुला चोरीचे सोने दिले असे सांगून तुला गुन्ह्यामध्ये गुंतवेल, अशी धमकी देऊ लागला.

 

तू लई मोठा रिल्स स्टार आहेस ना, आता बघ मी कशी तुझी सगळी हवा काढतो, तु मला आताच्या आता ३ लाख रुपये दे, नाही तर मी तुझी सोशल मिडियावर बदनामी करेल आणि मी चोरी केलेले सोने तुला देतो, असे सोशल मिडियावर सांगेल. मग तुझ्या फॉलोवर्सला कळेल तू कसा गोल्डन बॉय झाला आहेस ते, असे बोलून धमकावू लागला.

त्यानंतर त्याने गुरुवारी (ता. २४) बडेकर हा ऊरुळी कांचनचा गोल्डन बॉय आहे, याचेकडे माझे लाखो रुपये आहेत. मोनु तू माझे पैसे बुडवु नको, असा बदनामीकारक व्हिडिओ बनवून तो सोशल मिडियावर पोस्ट केला. ही बाब फिर्यादींना समजल्यावर त्यांनी महेश याला फोन केला. तेव्हा त्याने बदनामी करुन गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी दिली.

दरम्यान, फिर्यादी यांनी घाबरुन त्याला २ लाख रुपये दिले. त्यानंतर महेश हा वारंवार बदनामीकारक व्हिडिओ पोस्ट करुन फिर्यादी यांची बदनामी करत आहे आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी करीत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख तपास करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अभिजीत दीपकेंच्या ‘गुरु’चं गूढ उलगडलं! सगळ्या प्लॅनिंगमागे कोण? महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत

Sunday, 27 September 2026, 15:30

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10

CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई! आशुतोष रांकासह कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट सवाल

Sunday, 27 September 2026, 14:54

घरातून निघाले अन् दोन दिवसांनी धक्कादायक बातमी आली! निगडीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 27 September 2026, 14:53

विरोधकांनी अडचणी आणल्या नसत्या तर यशवंत कारखाना यंदा सुरू झाला असता; सुभाष जगताप

Sunday, 27 September 2026, 14:31

निमगाव केतकीतील दुचाकी चोरीचा पर्दाफाश; 1.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 14:24
Next Post

Nagar News : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी पुण्यातून ठोकल्या बेड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp