Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अमित शाहांच्या पुणे दौऱ्याने शहरात वाहतुकीचा ‘मेगा बदल’! आज-उद्या अनेक रस्त्यांवर निर्बंध, प्रवासापूर्वी पर्यायी मार्ग पाहा..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 15 November 2026, 8:19

पुणे : शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त आज रविवार (15 नोव्हेंबर) आणि सोमवार (16 नोव्हेंबर) रोजी वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले गेले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलले असून नागरिकांनी व वाहनचालकांनी पोलिसांच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

सोमवारी (16 नोव्हेंबर) पुणे जिल्हा परिषद आणि सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे अमित शाह यांचे कार्यक्रम नियोजित आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून किराड चौक ते नेहरू मेमोरिअल हॉल चौक हा रस्ता वाहनांसाठी बंद राहणार आहे. या मार्गावरील प्रवाशांनी किराड चौकातून जीपीओ मार्गे हॉटेल ब्ल्यू नाइल चौकात जावे व पुढे आपल्या इच्छित स्थळी मार्गस्थ व्हावे. याशिवाय, जिल्हा परिषद परिसरातील दोराबजी मॉल ते हॉटेल ब्ल्यू नाइल चौक हा मार्गही वाहतुकीस बंद असेल. जिल्हा परिषदेतील कार्यक्रमासाठी येणाऱ्यांनी एसजीएस मॉल, पूना क्लब, लेडीज क्लब, किराड चौक, पोलीस आयुक्तालय परिसरातील गल्ली, इस्कॉन मंदिर आणि ब्ल्यू नाइल चौक या ठिकाणी वाहने उभी करावीत.

तसेच, सदाशिव पेठेतील कार्यक्रमामुळे सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही हॉटेल, पेरुगेट पोलीस चौकी ते पावन मारुती मंदिर आणि भरत नाट्य मंदिर भागात वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.या दोन दिवसांच्या काळात शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवरही ‘नो पार्किंग’ लागू राहील. यामध्ये लोहगाव हवाई दल तळ ते विमाननगर रस्ता, रामवाडी ते मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनी, कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोड, जहांगीर हॉस्पिटल चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक आणि नेहरू मेमोरिअल चौक यांचा समावेश आहे.

सोबतच जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, फर्ग्युसन रस्ता (नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता), वेधशाळा चौक, संचेती चौक, पाटील इस्टेट, संगमवाडी ते येरवड्यातील सादलबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब रस्ता आणि 509 चौक ते लोहगाव हवाई दल तळ या रस्त्यांवरही सर्व प्रकारची वाहने लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अमित शाहांच्या पुणे दौऱ्याने शहरात वाहतुकीचा ‘मेगा बदल’! आज-उद्या अनेक रस्त्यांवर निर्बंध, प्रवासापूर्वी पर्यायी मार्ग पाहा..

Sunday, 15 November 2026, 8:19

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ट्विस्ट! सियाच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार? वकिलांच्या एका युक्तिवादाने तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह..

Sunday, 15 November 2026, 8:03

पुणेकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी लक्ष द्या! ‘रन फॉर युनिटी’मुळे फर्ग्युसन, गणेशखिंडसह पाषाण रस्ता 10 वाजेपर्यंत बंद; वाहतुकीत मोठे बदल..

Sunday, 15 November 2026, 7:47

दिवसा उन्हाचा चटका, रात्री हुडहुडी! महाराष्ट्रात हवामानाचा दुहेरी खेळ; IMD चा जिल्हानिहाय अंदाज जारी

Sunday, 15 November 2026, 7:30

आज रविवारचा दिवस ठरणार भाग्यशाली! दुर्मिळ शुभ योगांचा महासंयोग; या राशींचं नशीब चमकणार, धनलाभाचे संकेत!

Sunday, 15 November 2026, 7:17

शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा धडकणार? पक्षांतराचा मुहूर्त ठरणार; उदय सामंतांनी दिले संकेत!

Saturday, 14 November 2026, 22:49
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp