Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन जवळील ‘टायर फाट्यावर’ रविवारी (ता. 25) दुपारी आयशर टेम्पो, दोन चारचाकी कार व दुचाकी अशा चार वाहणांच्या विचीत्र अपघातात दहा नव्हे तर तब्बल बाराजण जखमी झाल्याचे पुढे आले आहे. बारापैकी दोनजण गंभीर जखमी झाले असुन, उर्वरीत १० जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती जिल्हा (ग्रामीण) पोलिसांनी दिली आहे.
पुणे- सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन जवळील ‘टायर फाट्यावर’झालेल्या ४ वाहनांच्या विचित्र अपघाताचा व्हिडीओ पहा… pic.twitter.com/h9y9rTPzU1
— Pune Prime News (@puneprime_news) June 25, 2023
दरम्यान रविवारी (ता. 25) दुपारी आयशर टेम्पो, दोन चारचाकी कार व दुचाकी अशा चार वाहणांच्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला असुन, या विचीत्र अपघातात सचिन कुमार, आशिष कुमार, राज किशोर, (रा. तिघेही पुणे, मुल रा. उत्तरप्रदेश) रोहित बबनराव गायकवाड, सोनाली रोहित गायकवाड, हर्ष रोहित गायकवाड, छबी (टोपण नाव) रोहित गायकवाड, (चौघेही रा. वाघोली, ता. हवेली) रामदास आहेरकर, विनोद होसमानी, विवेक होसमान, शकंर नारळे व बबलु कुवार (पत्ता माहित नाही) असे बाराजण जखमी झाले आहेत.
वरील बाराही अपघातग्रस्तांना कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केअर रुग्ण वाहिकेच्या मदतीने उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल, सिध्दीविनायक हॉस्पिटल, झेड प्लस हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले आहे.
अपघातस्थळावरील प्रत्यक्ष दर्शीकडुन मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने एक आयशर टेम्पो हा बांधकामाच्या लोखंडी प्लेटा घेऊन भरधाव निघाला होता.टेंपो दौंड तालुक्यातील बोराऐंदी हद्दीतील टायर फाट्यावरुन जात असतांना, भरधाव टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व रस्ता दुभाजक ओलांडून पुण्याच्या बाजूकडे निघालेल्या एका चारचाकी गाडीला धडकला. यावेळी टेम्पोचा वेग जास्त असल्याने पाठीमागून येणाऱ्या एका चारचाकी गाडीला जोरदार ठोस दिली. तसेच सदरचा अपघात पाहून बाजूला उभे राहिलेल्या एका दुचाकी चालकाला धडकला. तर त्याचवेळी एपघातग्रस्त वाहणाला आनखी एक मारुती स्विफ्ट कार जाऊन धडकली. अपघात एवढा भीषण होता कि. यामध्ये टेम्पो, दोन चारचाकी गाड्या व एका दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघातात टेम्पो, चारचाकी गाडीतील व एक दुचाकी चालक असे एकूण १२ जन जखमी झाले असून यामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून तब्बल १० जन जखमी झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी प्रतिष्ठानचे बापू गिरी, संतोष झोंबांडे, सुरेश वरपे, कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, लाईफ केअर रुग्ण वाहिकेचे चालक अजित कांबळे,, लाईफ केअरचे अध्यक्ष सिद्धू चव्हाण यांच्या मदतीने विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर उभ्या असलेल्या अपघातग्रस्त वाहनाला पाठीमागून येणाऱ्या एका चारचाकी गाडीने पंधरा मिनिटाच्या अंतराने जोरदार धडक दिल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात गाडीचे नुकसान झाले आहे. अशा एकूण ५ वाहनांचा अपघात झाल्याची माहिती उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली आहे.
नशीब बलत्तर म्हणून वाचले दोन चारचाकीतील नागरिकांचे प्राण..
सदर अपघाताच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून या घटनेत अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे. त्यामुळे उपस्थित असलेले नागरिक म्हणीत आहेत नशीब बलत्तर म्हणून वाचले दोन चारचाकीतील नागरिकांचे प्राण..