लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी टेबल लॅंन्ड पठारावर वीज कोसळून तीन घोड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी (ता.२० दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. या घटनेत घोडे व्यावसायिकांचे तब्बल ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शंकर गायकवाड, संभाजी दामगुडे आणि सुनील कांबळे असे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचगणी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे काही घोडे व्यावसायिकांनी आपली घोडी झाडालगत असणाऱ्या स्टॉल समोर व आडोश्याला बांधून सदर व्यावसायिक दुसऱ्या स्टॉल
दरम्यान, झाडाखाली, स्टॉलच्या समोर व आडोश्याला थांबलेल्या घोड्यांवर वीज पडून तीन घोडी जागीच ठार झाले आहेत. तर सुदैवाने घोडे व्यावसायिक झाडापासून दूर असल्याने बचावले आहेत. परंतु, ऐन दिवाळी हंगामाच्या तोंडावर घोड्यांचा मृत्यू झाल्याने घोडे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.