पुणे : दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आडगाव (ता. खेड) येथून समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेला दोन्ही मुले दिवाळीची सुट्टीसाठी मामाच्या गावी आले होते. त्याच्या मृत्यूने त्याच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे.
सार्थक ढोरे आणि शिवम गोपाळे अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आडगाव ( ता. खेड) येथे रविवारी (ता. ३०) तीन वाजण्याच्या सुमारास पाझर तलावात सार्थक ढोरे, शिवम गोपाळे आणि प्रतीक गोपाळे हे तिघे मित्र पोहोयला गेले. त्यानंतर हे तिघे अचानक तलावाच्या पाण्यात बुडू लागले. यातील एक मुलगा थोडक्यात वाचला. पण नाकातोंडात पाणी जाऊन सार्थक आणि शिवम पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले. पोहण्यासाठी गेलेली मुलं बराच वेळ झाला आली नाही म्हणून शोधाशोध सुरु झाली. मात्र, प्रतिकने घडलेला प्रसंग सांगितला आणि त्यानंतर शोध माहीम सुरु करण्यात आली.
दरम्यान ही मुले बुडाली असल्याची माहिती समोर आली असता, स्थानिक बचाव यंत्रणांना कळवण्यात आली. तलावात या मुलांना शोधण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. अथक प्रयत्नांनी बुडालेल्या मुलांचे मृतदेह हाती लागले. दोन्ही मुले दिवाळीची सुट्टी असल्याने मामाच्या गावी आले होते. पण सुट्टीच्या दिवसात तलावाच्या पाण्यात उतरणं त्याच्या जीवावर बेतले. या मुलांच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते आहे. पोलिसांनीही या घटनेची नोंद करुन घेतली असून पुढील तपास करीत आहे.