उरुळी कांचन (पुणे)- कोरेगाव मुळ (ता. हवेली) येथील नेचर नेस्ट अॅग्रो टुरीझम या फार्म हाऊस रक्षाबंधणाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या, मार्केटयार्ड परीसरातील एका बांधकाम व्यावसायकाच्या अडीच वर्षाच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना तासाभऱापुर्वी घडली आहे.
कणक वर्धमान कोठारी (रा. राजलक्ष्मी को. ऑप. सोसायटी, गुलटेकडी) हे त्या पाण्यात बुडुन मरण पावलेल्या चिमुकलीचे नाव असुन, वरील प्रकार रविवारी (ता. 14) साडे चारवाजनेच्या सुमारास घडला आहे. लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी पोचले असुन, अधिक माहिती घेण्याचे काम चालु आहे.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव मुळ येथील चंद्रशेखर शितोळे यांच्या मालकीचे नेचर नेस्ट अॅग्रो टुरीझम या नावे फार्म हाऊसआहे. या फार्म हाऊसवर रविवारी सकाळी अकरा वाजनेच्या सुमारास रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी कणक वर्धमान कोठारी हिचे आई -वडील व त्यांचे पंचविस ते तीस नातेवाईक आले होते. दिवसभर विविध कार्यक्रम झाल्यावर, चार वाजनेच्या सुमारास कणकचे आई-वडील व त्यांचे नातेवाईक चहा पिण्यासाठी एका हॉलमध्ये थांबले होते.
त्याचवेळी कणक अचानक गायब झाली. कणकदिसत नसल्याचेलक्षात येताच, कनकच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता, ती फार्महाऊस शेजारील नाल्यात पाण्यात पडल्याचे आढळुन आले. कनकच्या आईवडीलांनी व नातेवाईकांनी कनकला पाण्यात पाण्यातुन काढले. व उरुळी कांचन परीसरातील एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र त्याठिकाणी सोय नसल्याने, कणकला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचार सुरु करण्यापुर्वीच कनकची प्राणज्योत मावळली असल्याची घोषणा तेथील डॉक्टरांनी केली.