(Accident News ) पुणे – नाशिक महामार्गावर (Pune-Nashik National Highway )एकलहरे (ता. आंबेगाव) येथे जुन्या रस्त्यावर गुरुवारी (ता.९ ) रात्री पावणे नऊच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन वारकऱ्यांना एसटी बसने धडक दिली. या अपघातात ( Accident) एका वारकऱ्याचा उपचारादरम्यानमृत्यू झाला असून दोन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
दिलीप नामदेव सुतार (वय.६०) असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. पांडुरंग जयवंत मंडले (वय.४० ), वसंत विष्णू पाटील (वय. ५० सर्व रा. बोरगाव, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) असे झालेल्या वारकऱ्यांचे नावे आहेत. तर, मंचर पोलिसांनी एसटी बसचालक बाळासाहेब कानवडे (रा. सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर) याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर हे वारकरी खाजगी जीप व टेम्पोतून एकूण 27 वारकरी आळेफाटा येथे मुक्कामी थांबणार होते. तेथून ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठीजाणार होते. श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर हे वारकरी खाजगी जीप व टेम्पोतून एकूण २७ वारकरी आळेफाटा येथे मुक्कामी थांबणार होते. तेथून ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठीजाणार होते.
दरम्यान, एसटीची धडक बसल्याने तीनही वारकरी रस्त्यावर कोसळले. एकलहरे ग्रामपंचायत सदस्य दशरथ लक्ष्मण सूर्यवंशी व इतर ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. त्यांनी मंचर पोलिसांकडे संपर्क केल्यानंतर पोलीस हवालदार घटनास्थळी आले. त्यांनी रुग्णवाहिकेतून तिघांनाही मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यानच सुतार यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरानी दिली. मंचर पोलिसांनी एसटी बसचालक बाळासाहेब कानवडे याला ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shiv Jayanti 2023 : पुण्यात शिवजयंती मिरवणुकीनिमित्त वाहतुकीत बदल ; जाणून घ्या!