Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics News : भाजपने 3 पत्रे दाखवित आ.भरणेंचा केला दावा खोटा, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच नीरा नदीवरील तावशी पुलास 17 कोटीचा निधी…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 10 March 2023, 12:06

दीपक खिलारे

(Politics News) इंदापूर : तावशी उदमाईवाडी थोरातवाडी रस्ता प्रतिमा 194 येथे नीरा नदीवर पूल मंजुरीसाठी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil )यांनी भाजपचे  (bjp) नेते असलेले बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडे प्रयत्न केले. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच शिवसेना-भाजप सरकारने तावशी पुलासाठी 17 कोटीचा निधी मंजूर केला असून, या पुलासाठी प्रयत्न केलेली तब्बल 3 पत्रे भाजपने दाखवून आ.भरणेंचा दावा खोटा ठरविला.

आमदारांनी खोटे श्रेय घेणे आता तरी बंद करावे

आमदारांनी खोटे श्रेय घेणे आता तरी बंद करावे, असा सल्ला देत इंदापूर तालुका भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले आहे. शिवसेना-भाजप सरकारच्या कामाचे श्रेय विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घेणे हा राज्यातील मोठा विनोद आहे, असा टोला भाजपने लगावला आहे.

 

राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार नसून शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आहे हे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी झोपेचे सोंग न घेता लक्षात घ्यावे. शिवसेना -भाजपचे सरकार हे गतिमान सरकार असून, इंदापूर तालुक्यातील रस्ते व पुलांच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.

तावशी येथे नीरा नदीवरील पुलासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये 17 कोटीचा निधी मंजूर केला. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दि. 2 फेब्रु.2023 रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना तावशी पुलासह तालुक्यातील 9 पुलांच्या कामास मंजुरी मिळण्यासाठीचे पत्र केले. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दि. 6 फेब्रु.23 रोजी तावशी पुलासह 9 पुलांच्या मंजुरीसाठी पत्र दिले.

सदर पत्रावर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सचिव (रस्ते)) यांना तात्काळ कारवाई करावी असा आदेश दिला. त्यानुसार राज्य शासनाने तावशी पुलासह इंदापूर तालुक्यातील इतर पुलांच्या कामाला दि.10 फेब्रु.23 रोजी प्रशासकीय मान्यता दिली. यामध्ये तावशी पुलाची प्रशासकीय मान्यता नं. PLN -2023/C. R.447/Plan 3, Dt.10/3/2003. Estimeted Cost Rs.170000 thousand. (रु.17 कोटी ) असा आहे.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याकडेच इंदापूर तालुक्याच्या विकासाची दूरदृष्टी आहे. शिवसेना- भाजप सरकार सत्तेवर असल्याने आता तालुका विकासासाठी निधी कमी पडणार नाही असे भाजपचे तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी सांगितले.

भाजपचे लोकसभा बारामती मिशन…

केंद्र व राज्य भाजपचे बारामती लोकसभा निवडणूक 2024 हे मिशन असून, त्यानुसारच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात नीरा नदीवरील तावशी पुलासह इंदापूर तालुक्यातील इतर पुलांच्या व अनेक रस्त्यांच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, असे भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Politics News : भाजपने 3 पत्रे दाखवित आ.भरणेंचा केला दावा खोटा, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच नीरा नदीवरील तावशी पुलास 17 कोटीचा निधी!

Baramati Crime : बारामती तालुक्यातील सुपे येथील एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळविले; साडे सात लाख लंपास, घटनास्थळी पोलीस दाखल..!

Politics News : कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पुण्यातील कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता ??

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46
Next Post

Pune Crime News : दोन कुटूंबात वाद; लोखंडी रॉड व दगडाने छातीवर डोक्यावर मारहाण, राजीव गांधीनगर परिसरातील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.